शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसायासोबत बरेच शेतकरी शेळीपालन व्यवसाय करतात. कारण शेळीपालन व्यवसाय हा कमीत कमी खर्चामध्ये करता येणारा व्यवसाय असून त्या माध्यमातून मिळणारा नफा देखील चांगला असतो. परंतु त्यातही जर आपण मेंढीपालन व्यवसायाचा विचार केला तर या व्यवसायात देखील काही जमेच्या बाजू आहेत
त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो.लेखामध्ये आपण शेळीपालन व्यवसाय पेक्षा मेंढीपालन व्यवसाय कसा फायदेशीर ठरू शकतो? याबद्दल माहिती घेऊ.
मेंढीपालन व्यवसायातील जमेच्या बाजू
1- मेंढ्यांच्या पालन पोषणावर अर्थात खाद्यावर खर्च कमी- जर आपण मेंढ्यांचा विचार केला तर त्यांच्या एकूण आहार व्यवस्थापनावर खूप कमी खर्च करावा लागतो.
मेंढी ही गवत आणि झाडाचा हिरवा पाला यावर आपली उपजीविका अगदी आरामात करते. त्यामुळे आहार व्यवस्थापनावरील खर्च खूपच कमी लागते. मेंढी पालन यामध्ये जैसलमेरी, मारवाडी तसेच बिकानेरी,मारीनो, छोटा नागपुरी शहाबाद इत्यादी प्रकारच्या मेंढ्या जास्त प्रमाणात पाळल्या जातात.
2- शासनाकडून अनुदानाची सोय- आपल्याला माहित आहेच कि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी राज्य आणि केंद्र सरकार विविध प्रकारच्या योजना या पशुपालन संबंधी राबवतात.
याअंतर्गत मेंढी पालन साठी देखील केंद्र सरकारकडून 50 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते. एवढेच नाही तर देवीचा राज्य सरकारदेखील मेंढीपालनाला प्रोत्साहन मिळावे यासाठी अनुदान देत असतात.
जर आपण मेंढीपालन व्यवसायाचा विचार केला तर केवळ एक लाख रुपयांमध्ये हा व्यवसाय व्यावसायिक दृष्टिकोनातून सुरू करू शकतो. बाजारात एक मेंढी तीन हजारांपासून ते आठ हजार रुपयांपर्यंत विकली जाते.
3- मेंढीपालनातून मिळतात हे फायदे- जर आपण मेंढीपालनातून मिळणाऱ्या फायद्यांचा विचार केला तर या माध्यमातून लोकर उत्पादन,मांस आणि दूध मोठ्या प्रमाणात मिळू शकते.
तसेच लेंडीखत देखील मिळते जे आपण शेतीसाठी वापरू शकतो. मेंढ्यांच्या शरीरावर असलेल्या मऊ आणि लांब फराच्या माध्यमातून चांगली लोकर मिळते. या लोकरीचा उपयोग उत्तम प्रकारचे कपडे बनवण्यासाठी केला जातो.
नक्की वाचा:Goat Species: 'कोकण कन्याळ' देईल शेळीपालनात यशाची समृद्धी, वाचा या शेळीची माहिती
Published on: 08 October 2022, 11:13 IST