शेतकरी शेतीसोबत घर खर्चासाठी अनेक व्यवसाय करीत असतात. यामधीलच एक मुख्य व्यवसाय म्हणजे पशुपालन व्यवसाय. मात्र यामध्ये जनावरांची योग्य काळजी घेणे हे देखील तितकेच महत्वाचे असते.
दुग्ध उत्पादनासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (Scientists developed) शास्त्रज्ञांनी एक पर्यावरणपूरक खाद्य पूरक तयार केले आहे. जे खाद्य दिल्यानंतर जनावरांमध्ये दूध उत्पादन वाढेल तसेच जनावरांचे आरोग्यही एकदम चांगले राहील. दुग्धव्यवसाय यशस्वी होण्यासाठी जनावरे महत्त्वाची भूमिका बजावतात. चांगल्या उत्पादनासाठी ही बातमी महत्वाची ठरू शकते.
भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) शास्त्रज्ञांनी असे खाद्य पूरक तयार केले आहे, जे आहार दिल्यानंतर जनावरांच्या दुधाच्या उत्पादनात वाढ होईल, तसेच जनावरांचे आरोग्यही सुधारेल. शास्त्रज्ञांनी याला ग्रीन धार असे नाव दिले आहे.
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; पहिल्याच दिवशी कापसाला मिळाला 11 हजारांचा भाव
ग्रीन धाराचे फायदे
हरित धारा फीड सप्लिमेंट आयसीएआर- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅनिमल न्यूट्रिशन अँड फिजिओलॉजी, बंगलोर यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आले आहे. गाय, म्हैस आणि मेंढ्यांना ते खाल्ल्याने दूध उत्पादन 0.4 ते 0.5 किलोपर्यंत वाढते. शेतकऱ्यांना उत्पादनात दिलासा मिळेल.
यासोबतच गुरांमधून मिथेन वायूचे उत्सर्जन 17 ते 20% कमी करण्यात मदत होते. याने जनावरांची पचनशक्ती तर सुधारतेच, पण चांगले आरोग्यही मिळते. हे फीड सप्लिमेंट टॅनिन समृद्ध वनस्पती आणि इतर नैसर्गिक स्त्रोतांच्या मदतीने बनवले जाते.
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! 'या' तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार २२ कोटींची नुकसान भरपाई
जनावरांना फक्त भुस किंवा शेतीचे अवशेष तसेच संतुलित पशुखाद्य, चारा आणि इतर अनेक देशी व नैसर्गिक पोषक तत्वे खायला दिली जातात. हरित धारा देखील अशाच पर्यावरणपूरक आणि पूर्णपणे सुरक्षित पशुखाद्यांपैकी एक आहे, ज्याच्या आहारामुळे प्राण्यांचा सर्वांगीण विकास होतो.
महत्वाच्या बातम्या
लाभार्थ्याच्या मृत्यूनंतर कोणाला मिळणार पैसे? जाणून घ्या सविस्तर
सावधान! राज्यात पावसाचा वेग वाढला; हवामान विभागाकडून आज संपूर्ण महाराष्ट्रात 'यलो' अलर्ट जारी
'या' राशींना लागणार मोठी लॉटरी; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
Published on: 08 October 2022, 11:05 IST