शेतीला जोडधंदा म्हणून आता अनेक शेतकरी मत्स्यपालन व्यवसाय करू लागले आहेत.शेतामध्ये शेततळे निर्माण करून त्या शेततळ्यामध्ये विविध प्रजातींच्या माशांचे पालन करून शेतकरी चांगला नफा कमवीत आहेत. आपल्याला माहित आहेच कि माशांच्या तशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजाती आहेत. परंतु यामध्ये ग्रास कार्प ही माशाची प्रजात खूप उपयुक्त आहे. या प्रजाती विषयी आपण या लेखात माहिती घेऊ.
नक्की वाचा:Animal Care: पशुंचे आरोग्य आणि कॅल्शियम यांचा काय आहे परस्पर संबंध? वाचा डिटेल्स
ग्रास कार्प माशाचे वैशिष्ट्य
हा मासा गवत आणि शेवाळ खाऊन स्वतःचा उदरनिर्वाह करतो. तसेच या माशांची वाढ खूप वेगाने होते कारण हा मासा जास्त प्रमाणात खाद्य खात असतो. त्याच्या वजनाच्या तीन पट जास्त खाद्य हा मासा खातो.
या माशाची लांबी सरासरी 60 सेंटिमीटर पेक्षा जास्त असते व वजन 40 किलो पर्यंत जाऊ शकते. ग्रास कार्प मासा ओळखायचा असेल तर या माशाचे तोंड निमुळते आणि अरुंद असते. या माशाच्या शेपटीचा पर हा दुभंगलेला असतो.
हा मासा पाण्यामधील पान वनस्पती तसेच गवत खात असतो म्हणून याला ग्रास कार्प किंवा गवत्या मासा असे देखील म्हणतात. हा मासा पाण्याच्या मधल्या भागामधे राहतो व या मधल्या भागातीलच गवत अथवा पाणवनस्पती खात असतो.
नक्की वाचा:शेतकऱ्यांनो कमी कालावधीत बक्कळ पैसा कमवायचा आहे? तर प्लायमाउथ रॉक कोंबडीचे पालन कराच...
या माशाचे वजन एका वर्षात एक हजार ते पंधराशे ग्रॅमपर्यंत वाढते. हा मासा मिश्र शेती साठी खूप चांगला मानला जातो. ग्रास कार्प मासा दुसऱ्या वर्षात प्रजनन करण्यासाठी तयार असतो.
जवळजवळ आठ महिन्याच्या कालावधीत या माशाचे वजन अर्धा ते एक किलो पर्यंत वाढलेली असते. जवळ जवळ एक हेक्टर क्षेत्रावर ग्रास कार्प माशांचे उत्पादन आठ टन उत्पादन मिळते. हा मासा जास्त खाद्य खात असल्यामुळे त्याचे वजन जास्त वाढते.
ग्रास कार्प माशांचे संवर्धन कसे करावे?
या माशाच्या संवर्धन करताना ते मोनोकल्चर मध्ये करू नये. त्याचे संवर्धन कंपोझिट किंवा पॉली कल्चरमध्ये करावे. यामुळे पाण्यातील जैवविविधता टिकून राहण्यास मदत होते व चांगले जैवविविधता माशांच्या वाढीसाठी योग्य मानले जाते.
नक्की वाचा:लाल कंधारी गाय शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा आधार बनेल; दूध उत्पादनातून मिळतो लाखोंचा नफा
Published on: 29 September 2022, 10:32 IST