Animal Husbandry

भारतामध्ये पशुपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो.आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पशुपालन व्यवसायात दूधउत्पादन हे आर्थिक उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. पशुपालना मध्ये गाई मोठ्या प्रमाणात पाळल्या जातात.

Updated on 11 July, 2022 8:28 PM IST

भारतामध्ये पशुपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो.आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पशुपालन व्यवसायात दूधउत्पादन हे आर्थिक उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. पशुपालना मध्ये गाई मोठ्या प्रमाणात पाळल्या जातात.

आपल्याला माहित आहेच की, गाईंच्या अनेक प्रकारच्या जाती भारतात आहेत. त्यापैकी काही देशी तर काही संकरित प्रकारच्या आहेत.

प्रत्येक जातीचे वेगवेगळे वैशिष्ट्य असून दूध देण्याची क्षमता देखील वेगवेगळे आहे. या लेखामध्ये आपण गायीच्या अशाच एका जातीबद्दल माहिती घेणार आहोत. जी सर्वाधिक दूध देण्यासाठी ओळखली जाते.

नक्की वाचा:Animal Care:पावसाळ्यात पशुधनाचे 'या' आजारांपासून करा रक्षण,'या' उपाययोजना ठरतील लाभदायी

कमीत कमी आहारात जास्त दूध देणारी 'राठी गाय'

 अनेक प्रकारच्या जाती गाईंच्या आहेत परंतु यामध्ये राठी गाय आहे ही एक फार महत्त्वपूर्ण आणि फायदेशीर जात आहे.सर्वाधिक दूध देणारी गाय म्हणून तिला सगळीकडे ओळखले जाते.

या जातीच्या गाई मुख्यत्वेकरून राजस्थानच्या बिकानेर पासून ते पंजाब राज्याच्या सीमेपर्यंतच्या प्रदेशात आढळतात.याच गाईंना राजस्थानमध्ये कामधेनु असे देखील म्हटले जाते.या गाईच्या गुणधर्मांचा विचार केला तर साहिवाल जातीच्या गायी मिळतेजुळते या गाईशी गुणधर्म आहेत.

नक्की वाचा:दुधाचा व्यवसायसोबत डेअरीतून तुपाचा बिझनेस करायचा तर या म्हैशीची जात आहे फायदेशीर

इतर जातींच्या गाई पेक्षा दूध देण्याची क्षमता  जास्त असते. जर वातावरण पोषक असेल तर पशुपालक या गाईपासून जास्तचे दुधाचे उत्पन्न मिळवू शकतात. 

अगदी कमीत कमी आहारात जास्तीत जास्त दूध देण्याची क्षमता या गाई मध्ये आहे. राठी गाईचे दूध देण्याची क्षमता ही 1062 ते 2810 दहा लिटर असते. जर आपल्याला गाईची निवड करण्याची कसब असेल तर आपण अधिक दूध उत्पादन करू शकता.

प्रतिदिन या गाई आठ ते दहा लिटर दूध देत असतात. परंतु आपण जर समतोल आणि पौष्टिक आहार या गायींना खायला दिला तर 25 ते 30 लिटरपर्यंत क्षमता दूध देण्याची या गाईंची आहे.

राठी गायीचे वैशिष्ट्य

 या गाई दिसायला आकर्षक असून चेहरा रुंद असतो तसेच या गाईंचा आकार मध्यम स्वरूपाचा असतो. गाईच्या अंगावर पांढरे ठिपके असतात. तसेच शिंगे मध्यम आकाराचे असून मागे वळलेली असतात.

शेपटी लांब असून वय झालेल्या गाईंचे वजन हे साधारण 280 ते 300 किलोग्राम असते. या गाईंच्या सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या कोणत्याही वातावरणात आणि परिसरात राहू शकतात.

नक्की वाचा:महत्वाचे! या 'टिप्स' वापरा आणि ओळखा गोठ्यातील जनावर आजारी आहे की निरोगी

English Summary: rathi cow is so profitable and give more milk production to farmer
Published on: 11 July 2022, 08:28 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)