शेतीसोबत पशुपालन व्यवसाय म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक यशाची गुरुकिल्ली असे म्हटले म्हणजे चुकीचे ठरणार नाही. बरेच शेतकरी पशुपालनाच्या माध्यमातून आर्थिक प्रगती करीत आहेत व पशुपालनामध्ये दूध उत्पादन हा एक प्रमुख आर्थिक स्रोत आहे. यात दूध उत्पादनाला धरूनच डेअरी फार्मिंग ही संकल्पना खूप महत्त्वाचे आहे. स्वतःची डेरी(फार्मिंग) सुरु करुन चांगल्या पद्धतीची आर्थिक प्रगती करता येते. एवढेच नाही तर यासाठी शासनाकडून कर्ज आणि सबसिडी दिली जाते.
नक्की वाचा:NDDB ने जनावर गाभण न राहण्याच्या समस्येवर सांगितलेले घरगुती उपचार, वाचा सविस्तर
अशा पद्धतीने करा सुरुवात
समजा तुमची गुंतवणुकीची क्षमता कमी असेल तर तुम्ही या सुरुवातीला 2 किंवा चार गाई किंवा म्हशी घेऊन डेअरी सुरू करू शकतात. नंतर जसा व्यवसाय वाढत जाईल त्याप्रमाणे गाईंची किंवा म्हशींची संख्या वाढवू शकतात.
सुरुवातीला दोन ते अडीच लाख रुपये खर्च करून व्यवसाय तुम्हाला सुरू करता येतो व कालांतराने व्यावसायिक तत्त्वावर सुरू करण्यासाठी दहा ते पंधरा लाख रुपयांची गुंतवणूक करण्याची यामध्ये गरज असते.
तुम्हाला यासोबत दुधावर प्रक्रिया करण्याचा प्लांट देखील कालांतराने सुरु करता येऊ शकतो. परंतु यासाठी खूप मोठी आर्थिक गुंतवणूक लागते. त्यामुळे कासवाच्या गतीने हा व्यवसाय वाढवत जाणे खूप महत्त्वाचे ठरते.
नक्की वाचा:Milk Production: जनावरांचे दूध वाढविण्यासाठी 'हे' घरगुती उपाय आवश्यक
डेअरी फार्मिंग अर्थात स्टार्टअप सुरु करण्यासाठी मिळणारे कर्ज आणि अनुदान
डेअरी फार्मिंग सुरू करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याकडून आर्थिक मदत केली जाते. समजा तुम्हाला दहा जनावरांचा स्टार्टअप सुरू करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणे शक्य आहे. या दहा लाख कर्जावर तुम्हाला नाबार्डच्या माध्यमातून 25%अनुदान दिले जाते.
परंतु तुम्ही जर एखाद्या आरक्षित वर्गातून येत असाल तर हे अनुदान 25 वरून थेट 33 टक्क्यांपर्यंत मिळते. यासाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्यासाठी आधार कार्ड, बँक पासबुक, उत्पन्नाचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक असते. तसेच तुमच्या डेअरी स्टार्टअपचा प्रकल्प अहवाल तयार करणे आवश्यक असते. यामध्ये तुमच्या व्यवसायाचे मॉडेल कोणत्या पद्धतीचे आहे याबद्दल उल्लेख करणे गरजेचे आहे.
सबसिडी कशी मिळवावी?
1-सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला आधी तुमचे स्टार्टअप अर्थात कंपनीचे रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे.
2- त्यानंतर तुमच्या स्टार्टअपचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करावा.
3- यामध्ये तुमच्या व्यवसायाचे एकंदर चित्र म्हणजे मॉडेल कोणत्या पद्धतीचे आहे याबद्दल माहिती देणे आवश्यक आहे.
4- यासाठी तुम्ही तुमच्या परिसरातील या क्षेत्रातील एखाद्या व्यावसायिकाचे मदत व मार्गदर्शन घेऊ शकतात.
5- ही सगळी कागदपत्रे सोबत घेऊन बँकेत कर्जासाठी अर्ज करावा.
6- कर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्ही ज्या बँकेत कर्ज घेतले आहे त्या बँकेकडून नाबार्डकडे अनुदानासाठी कागदपत्रे पाठवली जातात.
Published on: 05 September 2022, 03:19 IST