देशातील शेतकरी बांधव कुक्कुटपालन मोठ्या प्रमाणात करत असतात. यामध्ये कुक्कुटपालणाचा देखील समावेश आहे. आजची ही बातमी कुक्कुटपालन व्यवसायाशी निगडित असलेल्या शेतकऱ्यांसाठी विशेष फायद्याची आहे. खरं पाहता कुक्कुटपालन हा व्यवसाय मोठा फायदेशीर आहे मात्र असे असले तरी उन्हाळी हंगामात या व्यवसायात थोडी काळजी घेणे अतिशय महत्वाचे आहे.
या उन्हाळी हंगामात कोंबड्यांना उष्णतेच्या त्रासापासून वाचवले तर या व्यवसायातून जास्तीत जास्त कमाई केली जाऊ शकते. यामुळे उन्हाळ्यात पिल्ले आणि कोंबड्यांची काळजी कशी घ्यायची आणि त्यांना कोणता आहार द्यायचा हे आज आपण जाणून घेणार आहोत.
वास्तविक पाहता, कोंबडीच्या पिलांमध्ये उष्णता सहन करण्याची क्षमता खुप जास्त असते आणि पिल्ले 42 अंश सेंटीग्रेड तापमानात सहज जगतात. मात्र प्रौढ कोंबड्यांना उष्णतेचा जास्त त्रास होतो. या बाबत तज्ज्ञांनी अधिक माहिती देताना सांगितले की, उष्णता वाढल्यावर पिल्ले कोंबडी फार्म मध्येच ठेवावीत आणि कोंबडी फार्मच्या खिडक्या अर्ध्या पडद्याने झाकून ठेवाव्यात, जेणेकरून थेट सूर्यप्रकाशापासून संरक्षण मिळून हवेचे संचलनही सुरळीत होईल आणि यामुळे पशुधनाचे नुकसान होणार नाही.
महत्वाच्या बातम्या
Successful Farmer : सिव्हिल इंजिनिअरिंग केल्यानंतर सुरु केला पशुपालन व्यवसाय; आता करतोय जंगी कमाई
तज्ञांच्या मते, या काळात शेतात नेहमी शुद्ध पाण्याचा पुरवठा असायला हवा. कारण की उन्हाळ्यात कोंबड्यांनां नेहमीपेक्षा अधिक पाण्याची आवश्यकता भासत असते. यासाठी कोंबडीफार्म मध्ये नेहमी स्वच्छ आणि थंड पाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे. याशिवाय पाणी पिण्यासाठी असलेली भांडी प्लास्टिक आणि झिंक ऐवजी मातीची असावीत, कारण त्यातील पाणी थंड राहते. उन्हाळ्यात ओले अन्न कोंबडीना देणे खुप चांगले आहे, परंतु यासोबतच सावधगिरी देखील बाळगावी लागणार आहे कारण असे अन्न लवकर खराब होत असते.
जाणकार लोकांच्या मते, कोंबडी फार्मच्या पत्र्यावरील उष्णता कमी करण्यासाठी पत्र्यावर गवत इत्यादी टाकून छप्पर पांढरे करावे. जसं की आपणांस ठाऊकचं आहे कोंबडी व पिल्ले उष्णता सहन करू शकत नाहीत, त्यामुळे शेताच्या आजूबाजूला पोते टाकून त्यात सकाळ-संध्याकाळ स्प्रिंकलरने पाणी शिंपडावे.
छतावर पॅरा टाकून स्प्रिंकलरद्वारे पाणी टाकावे. मित्रांनो पांढरा रंग उष्णता शोषून घेतो, त्यामुळे छप्पर थंड राहते. आधुनिक पोल्ट्री फार्ममध्ये, उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी स्प्रिंकलर किंवा फॉगर सिस्टीम देखील स्थापित केली जाते, ज्यामधून पाण्याचे फवारे बाहेर पडतात. पंखे देखील स्प्रिंकलरसह स्थापित केले पाहिजेत आणि खोलीची खिडकी देखील उघडी असावी, जेणेकरून खोली हवेशीर आणि थंड होईल.
Published on: 30 April 2022, 10:56 IST