भारत हा कृषिप्रधान देश असून भारतामध्ये ग्रामीण भागातील बहुसंख्य लोक शेती हा व्यवसाय करतात.अधिक उत्पन्नासाठी बरेच शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन,कुक्कुटपालन,मत्स्यपालन इत्यादी व्यवसाय करत असतात.
या व्यवसायांमध्ये जर उच्च तंत्रज्ञानाचा वापर केलातर नक्कीच निश्चित फायदा मिळू शकतो.जर आपण यामध्ये मत्स्यपालनाचाविचार केला तर बहुसंख्य शेतकरी आता शेततळ्यांमध्ये मत्स्य शेती करीत आहेत. काळानुरूप मत्स्य पालणा मध्ये देखील वेगवेगळ्या तंत्रांचा वापर केला जात आहे.
असेच एकफायदेशीर आणि महत्त्वपूर्ण तंत्र मत्स्यपालनाचा क्षेत्रात आले आहे.या तंत्राच्या मदतीने तुम्ही अगदी तलावा शिवाय मत्स्यशेती करून चांगला नफा मिळवू शकतात. या लेखामध्ये आपण हे तंत्र जाणून घेऊ.
मत्स्यपालन आतील हे अनोखे तंत्र
तलावा शिवाय मत्स्य पालन करणे हे ज्या तंत्राने साध्य झाले, या तंत्राला बायॉफ्लोकपद्धतीने मत्स्य पालन करणे असे म्हणतात. या तंत्रामध्ये मत्स्यपालनाला खूप कमी जागा लागते आणि यामध्ये मत्स्यपालन अगदी सोप्या पद्धतीने करता येते.बायॉफ्लोक मध्ये मासे खूपलवकर वाढतात आणि तयार होतात.
कमी वेळेतउत्पादन हातात घेऊन लवकर उत्पन्न मिळते.एवढेच नाही तर या तंत्रज्ञानामध्ये पाण्याचा अगदी कमीत कमी वापर करून मत्स्य पालन करता येते.बायॉफ्लोक पद्धतीने कोणत्याही प्रकारचे मासे पाळले जाऊ शकतात.
कमी खर्चात ते विक्रीसाठी तयार करता येतात.शेतकरी कमी खर्चात आणि पटीने जास्त उत्पन्न मिळवतात.या तंत्रज्ञानामध्ये फक्त बायॉफ्लोक तयार करणे,जिरे आणि मासे यांच्या आहारावर खर्च करावा लागतो.उत्पन्ना एकूण खर्च पेक्षा कितीतरी पटीने अधिक होते.बायॉफ्लोक तंत्रज्ञानामध्ये मत्स्य शेती करून शेतकऱ्यांना दोन उत्पादने मिळतात.
बायॉफ्लोक कसा तयार केला जातो?
बायॉफ्लोक तयार करण्यासाठी फक्त एक गुंतवणूक आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी बायॉफ्लोक तयार केल्यावर ते त्यामध्ये मत्स्यपालन सुरू ठेवू शकतात. एकदा बायॉफ्लोक तयार केल्यानंतर दहा वर्षापर्यंत कोणत्याही प्रकारचे समस्या येत नाही. बायॉफ्लोक बनवण्यासाठी लोखंडी पत्राचा वापर केला जातो व त्यावर लोखंडी जाळी लावली जाते जेणेकरून बायॉफ्लोक सुरक्षित राहील.
बायॉफ्लोक मध्ये ऑक्सिजन पुरवण्यासाठी एअर पंप बसवले जातात जेणेकरून माशांना पुरेसा ऑक्सिजन मिळू शकेल. दोन घनमीटर चे बायॉफ्लोक तयार करण्यासाठी एकूण दहा हजार रुपये खर्च येतो. एकदा बायॉफ्लोक तयार केल्यानंतर ते किमान दहा वर्षे टिकते आणि शेतकऱ्यांना अनेक वेळा उत्पादन मिळते.
एका वर्षात एक लाख कमवू शकतात
बायॉफ्लोक तंत्रज्ञानामध्ये मच्छी उत्पादकांना वर्षातून दोनदा उत्पादन मिळते. मासे सोडले की पाच ते सहा महिन्यात तयार होतात.
दोन क्युबिक मीटर च्या बायॉफ्लोक मध्ये एकाच वेळी 400 ते 500मासे तयार केले जातात. त्यांचे वजन एक ते दीड किलोपर्यंत असते. बाजारात त्यांची किंमत 150 ते 200 रुपये प्रति किलो आहे. अशाप्रकारे वर्षातून दोनदा उत्पादन घेणारा शेतकरी बायॉफ्लोक पद्धतीने मत्स्य शेती करून एक लाख रुपयांपर्यंत कमाई आरामात करू शकतो.
Published on: 02 June 2022, 12:06 IST