Animal Husbandry

उन्हाळ्यातील तापमान आपल्या पशुधनाला आवश्यक असणाऱ्या तापमानापेक्षा खूप जास्त असते. जनावरांची तापमान सहन करण्याची पातळी ठरलेली असते संकरीत व विदेशी रक्तगट असणाऱ्या गाईसाठी २४ ते २६ अंश सेल्सिअस, देशी गाईसाठी ३३ अंश सेल्सिअस तर म्हशींसाठी ३६ अंश सेल्सिअस ही तापमानाची उच्च सहन पातळी आहे.

Updated on 09 May, 2023 12:44 PM IST

उन्हाळ्यातील तापमान आपल्या पशुधनाला आवश्यक असणाऱ्या तापमानापेक्षा खूप जास्त असते. जनावरांची तापमान सहन करण्याची पातळी ठरलेली असते संकरीत व विदेशी रक्तगट असणाऱ्या गाईसाठी २४ ते २६ अंश सेल्सिअस, देशी गाईसाठी ३३ अंश सेल्सिअस तर म्हशींसाठी ३६ अंश सेल्सिअस ही तापमानाची उच्च सहन पातळी आहे.

वाढत्या तापमानामध्ये शरीराचे तापमान टिकवून ठेवण्यासाठी उर्जा खर्च झाल्यामुळे इतर शरीर क्रियांसाठी ऊर्जा कमी पडते त्यामुळे अशा काळात प्रजनन चक्र अनियमित होवून सुप्त माजाच्या प्रमाणात वाढ होते, माजाची तीव्रता कालावधी व गर्भधारणेचे प्रमाण कमी होवून दोन माजातील अंतर वाढते. गर्भधारणा झालीच तर गर्भपात होतो. हंगामी वांझपणा येतो.

शरीराचे तापमान वाढल्यामुळे जनावरांची भूक कमी होवून पाण्याची गरज वाढते. ती पूर्णपणे भागवली नाही तर शरीरातील पेशीमधील पाणी कमी होते. क्षारांचे शरीरातील प्रमाणही बदलते. त्यामुळे भूक मंदावते. जनावरांची रोगप्रतिकार शक्ती कमी होवून जनावरे इतर आजाराला बळी पडतात.

गाळप परवाना उल्लंघन प्रकरणी राज्यातील 22 कारखान्यांना दणका! कोटींचा झाला दंड...

गोठ्याची रचना ही उष्णतेचा ताण कमी करणारी असावी. गोठ्यातील तापमान १५ ते २५ अंश सेल्सिअस राखण्याचा प्रयत्न करावा, गोठा व परिसर थंड राहील याची काळजी घ्यावी. जनावरांचे शेड पूर्व पश्चिम लांबी असणारे असावे.

गोठ्यात हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. गोठ्याच्या रिकाम्या भागावर गोणपाटाचा पडदा बांधून तो पाण्याने ओला करत राहावे. गोठ्यात जनावरांना बसण्यासाठी सावलीची भरपूर जागा उपलब्ध असावी (४० ते ५० वर्ग फूट). गोठ्यात जनावरांची गर्दी करू नये.

गोठ्याचे छत पत्र्याचे असतील तर त्याला बाहेरून पांढरा रंग लावावा, गोठ्याच्या छतावर गवत, पाचट किंवा उपलब्ध तत्सम सामुग्रीचे ६ इंच जाडीचे आच्छादन द्यावे. जनावरांचे प्रखर सूर्यप्रकाशापासून संरक्षण करण्यासाठी गोठ्याच्या परिसरात झाडे व हिरवळ असावी.

गाळप परवाना उल्लंघन प्रकरणी राज्यातील 22 कारखान्यांना दणका! कोटींचा झाला दंड...

वातावरणातील तापमान वाढू लागले की जनावरे या वाढत्या तापमानाला जुळवून घेण्यासाठी घाम व श्वासाची गती वाढवून थंड ठेवण्याचा प्रयत्न करतात परंतु एकवेळ अशी येते की, जनावरे घाम व श्वासाची गतीद्वारे शरीर थंड ठेवू शकत नाहीत, त्यांच्या शरीराच्या तापमानामध्ये वाढ होण्यास सुरुवात होते.

हे झाड बदलणार शेतकऱ्यांचे नशीब! लागवड करा आणि करोडपती व्हा...
पुण्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता! पुढचे चार दिवस महत्वाचे
आता मजुरांनाही मिळणार विम्याचा लाभ, जाणून घ्या...

English Summary: May is very hot, take care of livestock..
Published on: 09 May 2023, 12:44 IST