Animal Husbandry

शेळीपालन व्यवसाय हा प्रामुख्याने लहान शेतकरी आणि सुशिक्षित बेरोजगार तरुण यांच्यासाठी वरदान ठरत आहे. आपल्याला माहित आहेच की, शेळीला खूप कमीत कमी जागा आणि शेळी हा काटक प्राणी असून झाड पाल्यांच्या सह्हयाने सुद्धा उदरनिर्वाह करू शकते. शेळ्यांना देखील पोषक आहार व्यवस्थापन केले तर नक्कीच शेळी पालक यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होते.

Updated on 26 July, 2022 3:32 PM IST

 शेळीपालन व्यवसाय हा प्रामुख्याने लहान शेतकरी आणि सुशिक्षित बेरोजगार तरुण यांच्यासाठी वरदान ठरत आहे. आपल्याला माहित आहेच की, शेळीला खूप कमीत कमी जागा आणि शेळी हा काटक प्राणी असून झाड पाल्यांच्या सह्हयाने सुद्धा उदरनिर्वाह करू शकते. शेळ्यांना देखील पोषक आहार व्यवस्थापन केले तर नक्कीच शेळी पालक यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होते.

आहार जर पोषक नसेल तर त्याचा सरळ परिणाम हा शेळ्यांच्या वजनावर होतो. त्यासाठी पोषक आहार व्यवस्थापन शेळ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने शेळ्यांसाठी कपाशीच्या पराठ्यापासून पोषक असे खाद्य पर्याय उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये कपाशीच्या झाडांचा म्हणजेच पराट्या मध्ये ढेप, मका, चुनी, खनिज मिश्रण  त्यासोबतच चोकर यांचा यांचे एक सर्वसमावेशक मिश्रण तयार केले जाते.

नक्की वाचा:आता वाहणार दुधाची नदी! दूधउत्पादकांनो गाई-म्हशींना द्या हा हिरवा चारा, होईल भरघोस दुधवाढ

त्यानंतर त्याचे यंत्राच्या माध्यमातून कांडी प्रकारांमध्ये खाद्य तयार केले जाते. हे कांडी खाद्य शेळ्या अत्यंत आवडीने खात असल्याचे समोर आले आहे. हे खाद्य पोषक असून गावरान शेळ्यांचे वजन नऊ महिन्यात 30 किलोपर्यंत वाढत असल्याचा संशोधकांचा दावा आहे.

कसे बनते हे खाद्यान्न?

 लिग्निन या घटकाचे प्रमाण कपाशीच्या झाडांमध्ये जास्त प्रमाणात असल्याने व त्याची पाचकता कमी असते. एवढेच नाही तर त्यामध्ये असलेले जे काही पचनीय घटक आहेत ते सेल्युलोज फायबर ने देखील बद्ध होऊन जातात.

नक्की वाचा:सर्वात लहान शेळी आणि सर्वात जास्त पैसे मिळवून देणारी शेळी, शेतकऱ्यांना होणार फायदा

हे लिग्निनचे कठीण बंध तोडून, पचniyta वाढवण्याच्या उद्देशाने भारतीय प्रौद्योगिकी संस्थान पवई यांच्या सहकार्याने महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत नागपूर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील पशु पोषण आहार शास्त्र विभागांमध्ये कपाशीच्या पराटी वर ओझोन प्रक्रियेचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले असून

या प्रक्रियेसाठी हवेतील ऑक्सिजनचे रूपांतर ओझोनमध्ये करण्यासाठी ओझोन जनरेटरचा वापर करण्यात येत आहे. हा निर्माण झालेला ओझोन भिजवलेल्या पऱ्हाटी मध्ये कमीत कमी तीन तास पर्यंत सोडला जातो.

अशा रीतीने पराटि पचनीय बनते  व तिच्यामध्ये अन्य पोषक घटक मिसळले जाऊन या मिश्रणापासून यंत्राच्या माध्यमातून कांडी खाद्य तयार केले जाते.

नक्की वाचा:एकच नंबर! शेतकऱ्यांनो गाई-म्हशींना टक्कर देत आहेत या शेळ्यांच्या जाती; जाणून घ्या...

English Summary: making technology of goat feed from cotton reminants thats nutrisional for goat
Published on: 26 July 2022, 03:32 IST