Animal Husbandry

शेतकरी शेतीसोबत जोडव्यवसाय म्हणून अनेक व्यवसाय करीत असतात. बऱ्याच शेतकऱ्यांना मेंढी पालन व मांस उत्पादन याची माहिती कमी असते. विशेष म्हणजे भारत वगळता इतर देशांमध्ये आहारात शेळीच्या मांसापेक्षा मेंढी मांसाचे अधिक सेवन केले जाते.

Updated on 18 September, 2022 1:05 PM IST

शेतकरी शेतीसोबत जोडव्यवसाय म्हणून अनेक व्यवसाय करीत असतात. बऱ्याच शेतकऱ्यांना मेंढी (sheep) पालन व मांस उत्पादन याची माहिती कमी असते. विशेष म्हणजे भारत वगळता इतर देशांमध्ये आहारात शेळीच्या मांसापेक्षा मेंढी मांसाचे अधिक सेवन केले जाते.

याचे कारण नेमके कोणते. यातून मेंढी पालकांचा फायदा कसा? याविषयी आज आपण माहिती जाणून घेऊया. ऑस्ट्रेलिया, सौदी अरेबिया, तुर्की, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका व चीन इत्यादि देशांमध्ये भारतातून मेंढीचे मांस निर्यात करण्यास मोठी मागणी आहे.

मेंढ्यांची दूध उत्पादन क्षमता कमी असली तरी गाय व शेळीच्या दुधाच्या तुलनेत मेंढीच्या दुधाचे पोषणमूल्य जास्त आहे. अत्यंत कमी भांडवलातसुद्धा शेतकरी हा व्यवसाय सुरू करू शकतात. अशाच मांसासाठी प्रसिद्ध असणाऱ्या मेंढीबद्दल आज आपण जाणून घेऊया.

शेतकऱ्यांनो मेथीच्या 'या' वाणांची शेती करा; 50 हजार रुपयांपर्यंत मिळेल उत्पन्न

माडग्याळ मेंढीची जात प्रसिद्ध

देशपातळीवर माडग्याळ, मारवाडी, जैसलमेरी या मेढ्यांच्या जाती प्रामुख्याने मांस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. राज्यात प्रामुख्याने दख्खनी, माडग्याळसह काही गावठी मेंढ्यांच्या जाती आहेत. यापैकी माडग्याळ ही मेंढी जात मांसासाठी प्रसिद्ध आहे. महात्मा फुले कृषीविद्यापीठाने माडग्याळ मेंढीच्या वैशिष्ट्यांविषय़ी माहिती दिली आहे.

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात माडग्याळ या गावच्या सभोवताली सिद्धनाथ, कवठेमहांकाळ, रांजणी या गावात माडग्याळ मेंढ्या आढळून येतात. माडग्याळ या गावावरूनच या मेंढ्यांना हे नाव प्राप्त झाले आहे.

दख्खनी मेंढ्यांपेक्षा उंच, लांब, बाकदार नाक, लांब मान रंगाने पांढऱ्या व अंगावर तपकिरी चट्टे असणाऱ्या या मेंढ्यांची शरीर वाढ चांगली असते. बरेचसे मेंढपाळ या जातीच्या नराचा वापर आपल्या कळपात पैदाशीसाठी करतात.

गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! फक्त 417 रुपये गुंतवा आणि मिळवा 1 कोटी रुपये

इतर मेंढ्यांच्या तुलनेत अधिक रोगप्रतिकारक आहे. माडग्याळ नराचे वजन सर्वसाधारण ४० ते ५० किलो, तर मादीचे वजन ३५ ते ४० किलो इतके असते. प्रतिकूल वातावरणात तग धरतात.

महत्वाचे म्हणजे मेंढीच्या कोकराचे जन्मतः वजन ३ ते ३.५ किलो असते. तीन महिने वयाच्या मेंढीचे वजन १८ ते २२ किलो व ६ महिने वयाच्या मेंढीचे वजन २५ ते ३० किलो आहे. पूर्ण वाढ झालेल्या मेंढीचे वजन ४० ते ४५ किलो एवढे भरते.

महत्वाच्या बातम्या 
सावधान! सरकारला फसवून रेशन घेणाऱ्या लोकांवर होणार कारवाई
LIC च्या जीवन सरल योजनेत दरवर्षी मिळणार ५२ हजार रुपये; घ्या असा लाभ
हाडांना भरपूर कॅल्शियम देणारे हे पदार्थ दररोज खा; हाडं होतील मजबूत

English Summary: Madgyal sheep breed famous meat production
Published on: 18 September 2022, 01:05 IST