सध्या जनावरांतील लंपी स्किन (Lumpy Skin Disease) आजार महाराष्ट्रातही मोठ्या। प्रमाणात पसरत चालला आहे. गेल्या महिन्यापासून राज्यात अनेक ठिकाणी लंपी स्कीन आजाराचा (Disease) प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे जनावरे दगावणार नाहीत याची खबरदारी घेत पशुपालकांनी उपाय करण्याची गरज आहे.
गंभीर गोष्ट म्हणजे जनावरांमधील मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आतापर्यंत या आजारामुळे राज्यात २२ जनावरांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे.
या आजारावर लंपी प्रो व्हॅक (Lumpy Pro Vac) ही प्रतिबंधात्मक लस विकसीत झाली असली तरी त्या लसीचे ट्रायल सुरु आहे. त्यामुळे ती सध्या उपलब्ध नाही. शेळय़ांमध्ये देवी रोगावर वापरण्यात येणारी लस वापरून हा आजार नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
17 सप्टेंबरपासून सूर्याप्रमाणे चमकणार भाग्य; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
आजाराची लक्षणे आणि उपचार
या आजारामध्ये प्रथम जनावराला मध्यम स्वरूपाचा तर काही वेळेस भयंकर असा ताप येतो. जनावरांच्या डोळय़ातून आणि नाकातून पाणी येते, चारा खाणे, पाणी पिणे कमी होते, दुग्ध उत्पादन कमी होते.
महाराष्ट्रात 'यलो अलर्ट' जारी; नागरिकांना सतर्क राहण्याचा हवामान विभागाकडून इशारा
लसिका ग्रंथीना (lymph glands) सूज येते, जनावरांच्या शरीरावर अंदाजे दोन ते पाच से.मी. व्यासाच्या कडक आणि गोल आकाराच्या गाठी येतात. या रोगामुळे गाभण जनावरामध्ये गर्भपात होऊ शकतो. रक्तातील पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेटची संख्या कमी होते. त्यामुळे वेळीच डॉक्टरांशी संवाद साधा.
महत्वाच्या बातम्या
सोयाबीनच्या दरात मोठी घसरण; मिळतोय 'इतका' दर
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या आजचे नवीन दर
एलआयसीच्या 'या' योजनेत फक्त 122 रुपये गुंतवा आणि मिळवा 26 लाख रुपयांचा परतावा
Published on: 10 September 2022, 01:41 IST