सध्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणावर लम्पी रोगाचा प्रभाव वाढत आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये अनेक गाई मृत्यूमुखी पडल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. देशभरात जनावरांमध्ये लम्पी (Lumpy) त्वचा रोगाने थैमान घातले आहे. त्यामुळे पशुपालकांची (Cattle breeder) चिंता वाढली आहे.
महाराष्ट्रात (Maharashtra) प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेऊन लम्पी त्वचा रोगाला आला घालण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. राज्यात लसीकरणाचा (Vaccination) वेग वाढवण्यात आला आहे. असे असताना आता एक धक्कादायक बाब समोर आली आहे. सध्या लसीकरण केले जात आहे. मात्र लसीकरण केल्यानंतर देखील आता हा आजार होत आहे.
यामुळे आता लसीकरण केल्यावर सुद्धा जनावरांना लम्पीची लागण होत असल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील केन्हाळा येथील 30 जनावरांना लम्पी आजाराची लागण झाली आहे. यात काही लसीकरण झालेल्या जनावरांचाही समावेश असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
शेतकरी का तोट्यात जातोय? औषधे आणि कीडनाशकांच्या किमतीवर लावलाय 18 टक्के जीएसटी
यातील काही जनावरांची प्रकृती चिंताजनक आहे. विशेष म्हणजे, लसीकरण झालेल्या जनावरांना लम्पीची लागण होत असल्याने शेतकऱ्यांना धक्काच बसला आहे. केहाळा येथील 90 टक्के जनावरांचे लम्पी प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झाले आहे. तरीही लम्पीची लागण होत असल्याचे समोर येत आहे. लसीकरण झाल्यानंतर 21 दिवसांनंतर लम्पीचा धोका टळतो. त्यादरम्यान लागण होऊ शकते.
कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक, केले कांदा बाजार सत्याग्रह तिरडी आंदोलन
दरम्यान, लम्पी आजाराने (Lumpy Skin Disease) शेतकऱ्यांची अडचण वाढवली आहे. अनेक जनावरे यामुळे दगावली आहेत. तसेच यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. यासाठी आता प्रशासनाकडून देखील प्रयत्न केले जात आहेत.
महत्वाच्या बातम्या;
पुण्यात तीन दिवसीय डेअरी कार्यशाळेचे आयोजन, शेतकऱ्यांनो एकदा भेट द्याच
लम्पीकडे दुर्लक्ष, संतप्त शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना रक्ताने लिहले पत्र
रब्बी पिकाच्या पेरणीपूर्वी मागणीपेक्षा डीएपी ४४ टक्के कमी आणि युरिया २८ टक्के कमी, शेतकरी चिंतेत
Published on: 13 October 2022, 01:07 IST