Animal Husbandry

जनवरांमधील लम्पी आजारचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. याची शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याची जबाबदारी आता जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांवर सोपविण्यात आली आहे.

Updated on 12 October, 2022 11:38 AM IST

जनावरांमधील लम्पी आजाराचा प्रादुर्भाव (Lumpy Awareness) वाढतच चालला आहे. याची शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याची जबाबदारी आता जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांवर सोपविण्यात आली आहे.

हे काम ग्रामसेवक आणि पशुसंवर्धन (Animal Husbandry) विभागाच्या कर्मचाऱ्यांनाही देण्यात आले आहे. या अनुषंगाने औरंगाबाद जिल्हा परिषदेचे सीईओ विकास मीना यांनी मंगळवारी व्हीडिओ कॉलद्वारे आढावा बैठक घेतली.

जनावरांमध्ये आढळून येत असलेल्या लम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर आता पशुपालकांमध्ये जनजागृती करण्याचे काम जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना देण्यात आलेआहे.

याविषयी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी सूचना दिल्या आहेत. विकास मीना यांनी याबाबत मंगळवारी व्हीसीद्वारे आढावा बैठक घेतली आहे. यावेळी त्यांनी शिक्षकांसह ग्रामसेवक व पशुसंवर्धन विभागातील कर्मचाऱ्यांनीही पशुपालकांमध्ये जनजागृती करण्याचे आदेश दिले.

पोस्ट ऑफिसच्या ग्राम सुमंगल योजनेत 170 गुंतवा आणि मिळवा 19 लाख रुपयांचा परतावा

औरंगाबाद जिल्ह्यात लम्पी प्रादुर्भाव (Lumpy Awareness) वाढत आहे.त्यामुळे गावातच शंभर टक्के जनावरांचे लसीकर,बाधित जनावरांचे विलगीकरण, गोठ्यातील स्वच्छता, धूर फवारणी इ. उपक्रम राबविण्याबाबत शिक्षक आणि ग्रामसेवकांना निर्देशित केले. यापूर्वीच शिक्षकांना शंभराहून अधिक अशैक्षणिक कामे देण्यात आल्याचा दावा शिक्षक संघटनांनी केला आहे.

शेतकऱ्यांनो सावधान! नांदेड जिल्ह्यात लम्पीमुळे 27 जनावरांचा मृत्यू

त्यामुळे शिक्षकांना अशैक्षणिक (Non-academic works) कामे देऊ नयेत अशी सतत मागणी केली जाते. मात्र याबाबत शिक्षकांकडून कितपत प्रतिसाद मिळेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच या निर्णयाच्या विरोधात शिक्षक संघटनांकडून विरोध सुद्धा होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या 
शेतकऱ्यांनो मसूर मिश्र शेतीची करा लागवड; 110 दिवसात मिळेल भरघोस उत्पन्न
शेतकऱ्यांनो पिकांच्या पेरणीपूर्वी हे एक काम करा; खर्चामध्ये मोठी बचत होईल
मेष राशीने अनोळखी व्यक्तींपासून सावध राहा; जाणून घ्या संपूर्ण राशीचे राशीभविष्य

English Summary: Lumpy Awareness about cleanliness animal sheds smoke spraying teachers
Published on: 12 October 2022, 11:38 IST