शेतीसोबत पशुपालन व्यवसाय बरेच शेतकरी करतात. पशुपालन व्यवसाय मध्ये दूध उत्पादन हा एक आर्थिक उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत आहे. परंतु अधिक दूध उत्पादनासाठी गोठ्यातील जनावरांचे आहार व्यवस्थापन, आरोग्य व्यवस्थापन अजून बऱ्याच बारीक-सारीक गोष्टींविषयी व्यवस्थित व्यवस्थापन ठेवणे फार गरजेचे असते.
जर आपण जनावरांचा विचार केला तर बऱ्याचदा वेगवेगळ्या हंगामानुसार वेगळ्या प्रकारच्या आजारांचा प्रादुर्भाव देखील जनावरांना होतो.
त्यामुळे वेळीच काळजी घेणे खूप गरजेचे असते. नाही तर जनावरांच्या जीवावर बेतण्याची शक्यता निर्माण होते व याचा आर्थिक फटका पशुपालकाला मोठ्या प्रमाणात बसतो.
या लेखामध्ये आपण अशाच एका गंभीर आजाराविषयी माहिती घेणार आहोत जो जास्त दुधाचे उत्पादन देणाऱ्या जनावरांमध्ये याचा प्रादुर्भाव जास्त दिसतो.
'लेप्टोस्पायरोसिस' एक गंभीर आजार
जर आपण या आजाराविषयी विचार केला तर याचा प्रसार प्रामुख्याने गवत, जनावरांना द्यायचा चारा आणि प्रामुख्याने पिण्याचे पाणी यावर जर आजारी जनावरांचे मूत्र, गर्भाशयाचा स्त्राव पडला तर मोठ्या प्रमाणात प्रसार होतो.
या आजाराने जर एखादे जनावर प्रादुर्भावित असेल तर अशा जनावराच्या मुत्रा च्या माध्यमातून जवळजवळ चाळीस दिवसांपर्यंत ह्या लेप्टोस्पायरोसिस रोगाचे जंतू बाहेर पडत असतात.
नक्की वाचा:शेळीपालनातून दमदार कमाई हवी असेल शेळ्यांच्या या आजाराकडे द्या लक्ष
'या'ठिकाणी होतो जास्त प्रादुर्भाव
ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो अशा प्रदेशात किंवा ज्या ठिकाणी पाणथळ जागा जास्त असते व पाणी साचून राहते
अशा ठिकाणी आणि दुसरे महत्त्वाचे म्हणजे हवेत आद्रतेचे प्रमाण जर जास्त असेल तर लेप्टोस्पायरोसिस या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो.
या आजाराचे सगळ्यात गंभीर वैशिष्ट्य म्हणजे उंदराच्या शरीरात या आजाराचा जिवाणू जवळजवळ सुप्तावस्थेत बरेच दिवस राहतो व उंदराच्या मलमूत्राद्वारे हा आजार फारच झपाट्याने पसरतो. लहान वयाची वासरे या रोगाला पटकन बळी पडतात.
तसेच गाभण जनावरांना मध्ये आणि गर्भधारणेच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या जनावरांमध्ये लेप्टोस्पायरोसिस मुळे गर्भपाताचे समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते.
नक्की वाचा:शेतकऱ्यांनो अशाप्रकारे ओळखा जनावरांमध्ये मिठाची कमतरता
'लेप्टोस्पायरोसिस' चे महत्त्वाचे लक्षण
गाभण जनावरांना जर या आजाराचा प्रादुर्भाव झाला तर जनावर कुठल्याही प्रकारचे लक्षण दाखवत नाही व गर्भपात होतो.
या आजारासाठी प्रतिबंधात्मक उपाय
यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करायचा राहिला तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोष्ट म्हणजे घूस आणि उंदीर यांची गोठ्यातील संख्या कमी करायचे असेल तर गोठ्याच्या आजूबाजूला आणि गोठ्यात फार मोठ्या प्रमाणात स्वच्छता ठेवावी. जनावरांना जखम असेल तर त्वरित उपचार करावेत. तसेच काही लक्षणे दिसत असतील तर पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा.
नक्की वाचा:शेतकऱ्यांनो हा चारा ठरतोय फायदेशीर, गाईच्या दुधात होईल दुप्पट वाढ
Published on: 05 July 2022, 11:48 IST