Animal Husbandry

देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या मार्फत देशी जातीच्या गोवंशाचे संवर्धन व्हावे. या केंद्रासाठी आवश्यक तो निधीदेखील देण्यात येईल, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

Updated on 27 May, 2022 5:37 PM IST

pune - गोवंशाला भारतीय समाज व्यवस्थेत महत्वाचे स्थान आहे. शेतकरी कुटुंबात तर गोवंशाने समृद्धी आणण्याचे काम केले आहे. देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या मार्फत देशी जातीच्या गोवंशाचे संवर्धन व्हावे. या केंद्रासाठी आवश्यक तो निधीदेखील देण्यात येईल, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या वतीने 27 ते 29 मे च्या दरम्यान गोधन-2022 प्रदर्शनाचे आयोजिन करण्यात आले आहे. शिवाजीनगर येथे कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित केलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार नरेंद्र दराडे, अशोक पवार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांतकुमार पाटील,

पुणे जिल्हा सहकारी बँकचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, प्रमुख शास्त्रज्ञ सोमनाथ माने यांची उपस्थित होती. "महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राने देशात आपली एक वेगळीच ओळख तयार केली आहे. तसेच या केंद्राच्या माध्यमातून देशी गोवंशाच्या संवर्धनाचे चांगले कार्य होत आहे.

दीड कोटींचे बक्षीस,सगळ्यांना जेवण, बैलांची तपासणी; रंगणार देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत

राज्यात विभागानुसार वेगळे वातावरण असल्याने कोणत्या विभागात कोणत्या गायीचे पालन करावे, यासंदर्भात मार्गदर्शनाचे चांगले काम केंद्रामार्फत होत आहे. राज्यातील कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून प्रत्येक विभागात गोवंश प्रदर्शनाचे आयोजन करावे", असे वक्तव्य उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी यावेळी केले.
आपल्या भारतीय समाज व्यवस्थेत देशी गायीचे महत्व अनन्यसाधारण आहे.

देशी गायींचे गोमूत्र, शेण, सेंद्रिय खत, तूप, दुध, खवा हे देखील तितकेच महत्वाचे आहे. गायींच्या दुधापासून तयार केलेले पदार्थ तर आरोग्याला खूप फायदेशीर आहे. गोवंशाने शेतकरी कुटुंबात समृद्धी आणण्याचे काम केले आहे. त्यामुळे अशा संस्कृतीला जपण्यासाठी सरकार नेहमीच प्रयत्नशील राहील असेही ते म्हणाले.

दूध व्यवसाय हा महत्वाचा भाग आहे. त्यामुळे दुधाचे उत्पादन वाढवण्यासोबतच दुधाचे पॅकींग आणि मार्केटींगचे कार्यही महत्वाचे आहे. आधुनिक शेतीबाबत बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन होत आहे, त्यामुळे या केंद्राचे काम पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी केंद्राला नक्की भेट द्यावी असं आवाहन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केले.

या प्रदर्शनाच्या माध्यमातून देशी गोवंशाच्या चांगल्या जाती, त्यांची वैशिष्ट्ये तसेच नवनवीन संशोधन याबाबत माहिती देण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रदर्शनाचा शेतकरी बांधवांनी पुरेपूर लाभ घ्यावा आणि गोवंश संवर्धनासाठी पुढे यावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी केले. यावेळी पशुपालक शेतकरी गोशाळांचे पदाधिकारी,पशुतज्ज्ञ, डेअरी संस्थांचे प्रतिनिधी व कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.

गोड ऊसाची कडू कहाणी: शेतकरी पती-पत्नीचा थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न

गोधन माहिती प्रदर्शन-
या प्रदर्शनात साहिवाल, थारपारकर, रेड सिंधी, राठी, गीर या अस्सल देशी दुधाळ गोवंशाबरोबरच खिलार, देवणी, लाल कंधारी, डांगी, गवळाऊ, कोकण कपिला असे महाराष्ट्रीयन गोवंश असून पशुपालनातील नवीन तंत्र, दुध प्रक्रिया उद्योग,पशुखाद्य निर्मिती,चारा पिके, अशा विविध अवजारांची माहिती या प्रदर्शनामार्फत देण्यात येणार आहे.


शिवाय देशी गायींचे संगोपन, त्यांच्या व्यवस्थापनाची शास्त्रीय माहिती व प्रात्यक्षिके, पशुखाद्य निर्मिती तंत्र, त्या यंत्राचे प्रात्यक्षिके, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ निर्मिती यंत्रणा सोबतच त्याच्या विक्रीबाबत तंत्राची येथे माहिती देण्यात आली आहे. हंगामी, बहुवार्षिक चारा लागवड प्रक्षेत्र भेट, मूरघास निर्मिती तंत्र तसेच या यंत्रांचे प्रात्यक्षिके, शेण, गोमूत्र स्लरी जैविक मिश्रण, गोखर खत, व्हर्मिवॉश, गांडूळ खतनिर्मिती प्रात्यक्षिके,


शेणापासून मूल्यवर्धन, कुंड्या, पणती, मूर्ती, भेटवस्तू निर्मिती, बायोगॅस संयंत्राचे प्रकार आणि गॅस निर्मिती तंत्र, सौरऊर्जा वापराचे तंत्र याबाबतही या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान, कृषी अवजारे तसेच यंत्रांचा देखील या प्रदर्शनात समावेश करण्यात आला आहे.


उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी देशी गायींच्या गोठा व्यवस्थापनातील बारकावे, जनावरांचे औषधोपचार, जैव मिश्रण, देशी गाईंचे शेणखताचा उपयोग, गोमूत्राचा उपयोग, व्हर्मीवॉश शिवाय दुग्धव्यसायाच्या तसेच गोसंवर्धनाच्या संदर्भाबाबत सबंधितांना प्रश्न विचारले. यावेळी ट्रॅक्टर संचलित मुरघास यंत्र, आजारी असताना जनावरे उचलण्याच्या यंत्राबाबत तसेच नवनवीन अवजारांची माहिती त्यांनी जाणून घेतली. दुधापासून पदार्थ तयार करण्यात येत असलेल्या विभागाचीही त्यांनी पाहणी केली.

महत्वाच्या बातम्या:
महिला शेतकऱ्यांना मोफत खते, बियाणे? कृषिमंत्री दादा भुसे यांचे सूचक वक्तव्य
दीड कोटींचे बक्षीस,सगळ्यांना जेवण, बैलांची तपासणी; रंगणार देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत

English Summary: If farmers want to raise livestock, be sure to visit this exhibition; It will be beneficial
Published on: 27 May 2022, 05:37 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)