Animal Husbandry

पशुपालन व्यवसायामध्ये जनावरांना देखील विविध प्रकारच्या समस्या निर्माण होतात. काही समस्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून असतात किंवा प्रजननाच्या दृष्टिकोनातून असतात. यामध्ये जर आपण प्रजननाच्या संबंधित काही आरोग्यविषयक समस्या जनावरांना उद्भवल्या तर त्याचा थेट परिणाम हा एकंदरीत पशुपालनाच्या आर्थिक गणितावर होतो. अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या समस्या या जनावरांना होतात.आता जनावरांमध्ये जनावर व्यायल्यानंतर वार अडकणे म्हणजेच जार अडकण्याचे प्रकार घडतात.

Updated on 10 September, 2022 7:18 PM IST

नक्की वाचा:Loan: 10 शेळ्यांच्या पालनासाठी मिळणाऱ्या कर्जाची सविस्तर माहिती,वाचा अर्ज करण्याची पद्धत

आपल्याला माहीत असेलच की जनावर व्यायल्यानंतर जार हा सहा ते सात तासाच्या आत पडणे आवश्यक असते.  बर्‍याचदा तसे न होता त्याला वेळ लागतो. याची बरेच कारणे आहेत. वार म्हणजे जार हा एक गर्भाशयात तयार होणारा तात्पुरता अवयव असून वासराचा जन्म झाल्यानंतर शरीराकडून वारास होणारा रक्तप्रवाह बंद झाल्यामुळे त्याच्या पेशी निर्जीव होतात

व पाण्याचा अंश कमी झाल्यानं वारा अंकुचन पावते.  यामुळे तिचा गर्भाशयाची संपर्क तुटतो व ति लांब होते. परंतु बऱ्याचदा ती अडकते. वार अडकण्याच्या समस्यांपासून मुक्तता मिळवण्यासाठी आपण काही घरगुती उपाय पाहू

नक्की वाचा:सावधान! लंपी स्किन आजारामुळे जनावरांच्या जीवाला पसरतोय धोका; रोखण्यासाठी करा 'हे' उपाय

नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डने सांगितलेले काही नैसर्गिक घरगुती उपचार

 यासाठी साहित्य

एक मुळा,दीड किलो भेंडी आणि आवश्यकता असेल त्याप्रमाणे गूळ आणि मीठ इतक्या साहित्याची आवश्यकता असते.

1- जनावर विल्यानंतर दोन तासाच्या आत मध्ये एक मुळा खाऊ घालावा.

2- समजा जनावर व्यायलास आठ तास झाले तरी जार पडला नसेल तर दीड किलो भेंडीचे दोन भागात काप करावेत व गूळ व मिठासोबत जनावराला खाऊ घालावे.

3- समजा जनावर व्यायल्यानंतर बारा तास उलटून देखील जार पडला नसेल तर जार अर्थात वाराच्या मुळाशी गाठ बांधून गाठी पासून तीन इंच खालून वार कापावा. गाठ योनिमार्ग पर्यंत परत जाते. परंतु हाताने वार काढण्याचा प्रयत्न करू नये. जनावर व्यायल्यानंतर चार आठवडे होईपर्यंत एक मुळा प्रत्येक आठवड्याला खाऊ घालावा.

नक्की वाचा:गाभण शेळयांची काळजी कशा प्रकारे घ्यावी? वाचा सविस्तर

English Summary: home remedies for pregancy related problem to cow and buffalo
Published on: 10 September 2022, 07:18 IST