पशुपालन व्यवसाय शेतकऱ्यांसाठी खूप मोठा आर्थिक आधार स्तंभ असून भारतातील बहुसंख्य शेतकरी बंधू शेतीसोबत पशुपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणात करतात. जर आपण पशुपालन व्यवसायाचा विचार केला तर आता खूप मोठ्या पद्धतीने म्हणजेच व्यावसायिक दृष्टिकोनातून पशुपालन व्यवसाय केला जात असून त्यामध्ये विविध प्रकारच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा देखील वापर करण्यात येत आहे.
व्यवस्थापनाच्या आधुनिक पद्धती, उत्तम प्रतीच्या आहार व्यवस्थापन आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आरोग्य व्यवस्थापन हे पशुपालन व्यवसायातील यशाच्या शिखराकडे जाणाऱ्या रस्त्यातील प्रमुख टप्पे आहेत.
यातील आरोग्य व्यवस्थापन हा टप्पा खूपच महत्वपूर्ण असून याठिकाणी जर नियोजन कोलमडले तर आर्थिक फटका बसण्याची चान्सेस जास्त राहतात.
त्यामुळे जनावरांच्या आरोग्य व्यवस्थापनाबद्दल पशुपालकांनी खूप काळजीपूर्वक व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. या आरोग्य व्यवस्थापनाशी संबंधित एका महत्त्वपूर्ण आणि जनावरांसाठी घातक ठरणाऱ्या आजाराविषयी या लेखात आपण माहिती घेणार आहोत.
गाई व म्हशींमध्ये होणारा घटसर्प आजार
गाई व म्हशींमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो. त्यामुळे व्यवस्थित उपाययोजना करून या आजारावर वेळीच नियंत्रण करणे खूप गरजेचे आहे. या आजाराचा प्रादुर्भाव पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात होतो. परंतु इतर ऋतूंमध्ये देखील हा आजार उद्भवण्याची शक्यता असते.
या आजाराचा होणारा दुष्परिणाम म्हणजे या आजारामुळे अवघ्या चोवीस तासात जनावर मृत्युमुखी पडू शकतो. हा एक संक्रमक आजार असल्यामुळे वेळीच नियंत्रण मिळवण्याचा सल्लादेखील तज्ज्ञांकडून दिला जातो.
घटसर्प आजार हा पाच्छरेला मलोसिडा नावाच्या जिवाणूंच्या प्रादुर्भावामुळे होत असतो. घटसर्प आजारामध्ये जनावरांच्या वरच्या श्वसन मार्गावर विपरीत परिणाम होतो व त्यामुळे जनावरांना श्वास घ्यायला देखील अडचण निर्माण होते.
नक्की वाचा:सरकार देशातील सर्व पंचायतींमध्ये सहकारी डेअरी उघडणार, अमित शहा यांची माहिती
या आजारामुळे जनावरांची श्वसनसंस्था प्रभावीत झाल्यामुळे जनावर दगावण्याची शक्यता वाढते.या आजारात जनावरांना तीव्र स्वरूपाचा ताप येतो व जनावरांचे डोळे लाल होऊ लागतात. तसेच श्वास घ्यायला अडचण निर्माण होते. नाकातून देखील स्त्राव वाहू लागतात व जनावराला छातीमध्ये खूप वेदना व्हायला लागतात.
घटसर्प आजारावर प्रतिबंधात्मक उपाय योजना
1-यामध्ये जनावरांना वाचवण्याचे उपाय म्हणजे जनावरांना घटसर्प रोगाची लस पावसाळा सुरू होण्यापूर्वीच देणे गरजेचे आहे.तसेच गोठ्याची आणि जनावरांची स्वच्छता ठेवण्यासाठी विशेष प्राधान्य द्यावे.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पावसाळ्यामध्ये उघड्यावर जनावरांना चरायला सोडू नये.
घटसर्प आजारावर उपचार
घटसर्प अत्यंत घातक आणि संसर्गजन्य आजार असल्यामुळे जनावरांना लागण झाली तर कुठलाही प्रकारचा वेळ वाया न घालवता पटकन पशु वैद्यकीय तज्ञांची मदत घेणे गरजेचे आहे.
Published on: 17 October 2022, 04:11 IST