सध्या पशुपालन व्यवसाय हा हायटेक होऊ लागला आहे. आताची तरुण पिढी जी शेतीमध्ये पाऊल ठेवत आहे असे तरुण आता शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसायाकडे मोठ्या प्रमाणावर वळत आहेत. जास्त करून पशुपालन व्यवसायामध्ये म्हैसपालन आणि गाईंचे पालन केले जाते.या माध्यमातून दूध उत्पादन हा प्रमुख आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत असल्यामुळे बरेच शेतकरी बंधूंची जातिवंत गाई व म्हशी घेण्याकडे कल असतो.
जर आपण यामध्ये प्रामुख्याने गाईंच्या जातींचा विचार केला तर यामध्ये देशी आणि संकरित या दोन प्रकारच्या गाई असतात.बहुतेक शेतकरी जर्सी,एचएफ अर्थात होल्स्टिन फ्रिजियन या प्रकारच्या जातींचे पालन करतात. त्यासोबतच देशी गाई मध्ये देखील गिर, लाल कंधारी यासारख्या जाती खूप महत्त्वपूर्ण आहेत.
पण वाढीव उत्पादनासाठी अशीच एक गाईची जात आहे जी खूप महत्त्वपूर्ण असून या गाईपासून मिळणारे दुधाचे उत्पादन देखील जास्त असते व या गाईचे नाव आहे हरधेनू गाय हे होय. गाईच्या जाती बद्दल आपण या लेखात माहिती घेऊ.
हरधेनू गाय शेतकऱ्यांसाठी किफायतशीर
जर आपण या गाईचा विचार केला तर हरियाणाच्या लाला लजपतराय युनिव्हर्सिटी ऑफ व्हेटर्नरी अँड अनिमल सायन्सेस येथील शास्त्रज्ञांनी तीन गाईंच्या जातींचे एकत्रित संकर करून ही गाय तयार केली आहे.
तज्ञांच्या मते ही जात होल्स्टिन फ्रिजीयन, स्थानिक हरियाणवी आणि साईवाल जातीच्या संकरित जाती पासून तयार करण्यात आली आहे.
दररोज 55 ते 60 लिटर दूध देण्याची क्षमता
जर आपण या गाईचा विचार केला तर या गाईची दूध देण्याची क्षमता इतर जातींच्या तुलनेमध्ये खूप जास्त आहे.
या गाईपासून मिळणारे दुधाचा रंग हा इतर गाईच्या दुधापेक्षा जास्त पांढरा असतो तसेच जर आपण इतर गाईंच्या दूध देण्याची क्षमता याचा विचार केला तर दिवसाला सरासरी पाच ते सहा लिटर दूध देतात परंतु हरधेनू गाय दिवसाला पंधरा ते सोळा लिटरपर्यंत दूध देते. या गाईचे आहार व्यवस्थापन वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित राहिल्या तर एका दिवसात 55 ते 60 लिटर दूध ही गाय देऊ शकते.
Published on: 12 October 2022, 10:37 IST