शेतकरी पशुपालन व्यवसाय करतात व पशुपालन व्यवसायामध्ये गाय आणि म्हशीचे पालन मोठ्या प्रमाणात केले जाते. पशुपालन व्यवसायचा आत्मा दुधाचे उत्पादन हा आहे. जर शेतकऱ्यांना पशुपालनातून वाढीव दुध उत्पादन मिळाले तर नक्कीच शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीत भर पडते. परंतु जास्तीच्या दूध उत्पादनासाठी गाईंच्या जातिवंत जातींची निवड देखील तेवढेच महत्वाचे असते.
आता शेतकरी बंधू बऱ्याच प्रमाणात संकरित गाईंचे पालन करतात. परंतु काही देशी गाईंच्या जाती देखील दूध उत्पादनाच्या बाबतीत संकरित गाईपेक्षा सरस आहेत. या लेखात आपण अशाच एका देशी गाईची माहिती घेणार आहोत, जे शेतकरी साठी खूप फायदेशीर आहे.
नक्की वाचा:Murghaas Tips:मुरघास बनवा 'अशा' पद्धतीने, टिकेल जास्त दिवस आणि जनावरे राहतील निरोगी
जास्त उत्पादन देणारी गाय म्हणजेच गिर गाय
जर आपण गाईच्या या जातीचा विचार केला तर हे गुजरात राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. गुजरात राज्यामध्ये जे गिर जंगल आहे,
त्या जंगलाला गाईचे उगमस्थान म्हणून ओळखले जाते व म्हणूनच या गाईला गिर गाय म्हणून देखील संबोधले जाते.ही गाय शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय असलेली जात आहे. या गाईचे दूध उत्पादन क्षमतेबद्दल विचार केला तर जवळजवळ पन्नास लिटर ते 80 लिटर च्या दरम्यान तिचे दूध उत्पादन क्षमता आहे.
जर आपण संपूर्ण देशातील सगळ्यात जास्त दूध देणाऱ्या गाईंचा विचार केला तर त्यामध्ये गीर गाईचा नक्कीच समावेश होतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भारतातच नव्हे तर ब्राझील आणि इजराइल सारख्या देशांमध्ये देखील यासंगोपन केले जाते.
नक्की वाचा:कमी गुंतवणुकीत व्हाल मालामाल! दुग्धव्यवसाय सुरु करून दरमहा करा लाखोंची कमाई
गीर गायीचे वैशिष्ट्य
जर एकंदरीत या गायची आपण रचना पाहिली तर लाल रंगाची ही गाय असून या गाईचे कास मोठे असते. तसेच कान खूप लांब असून खाली लोंबकळणारे असतात. या गाईंचे वजन जवळ जवळ तीनशे पंच्याऐंशी किलोच्या आसपास असून उंची 130 सेंटिमीटर पर्यंत असते.
गीर गायीचा आहार
जर आपण त्या गाईच्या आहार व्यवस्थापनाबद्दल विचार केला तर त्यांना प्रथिने, विविध जीवनसत्वे आणि खनिजे असलेल्या संतुलित आहार देणे गरजेचे आहे.
यासाठी शेतकरी बंधू बार्ली, ज्वारी, मका,गव्हाचा कोंडा आणि इतर पदार्थ यांचा समावेश करू शकतात.हिरव्या चाऱ्यात बरसीम,चवळी तसेच मका व बाजरी इत्यादी खायला देणे देखील उपयुक्त ठरते.
नक्की वाचा:Milk Fat: 'या' उपाययोजना करा आणि वाढवा दुधातील फॅट,तरच येईल घरी आर्थिक गंगा
Published on: 15 August 2022, 03:54 IST