पशुपालनाच्या व्यवसायामध्ये पशुपालकांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. गुरांवर होणारा वातावरणाचा परिणाम गोठ्यातील अस्वच्छता इत्यादी मुळे अनेक प्रकारचे आजार गुरांना होतात. त्याचा फटका हा दूध उत्पादनावर होत असतो. बऱ्याचदा बुरशी युक्त खाद्य किंवा चारा खाल्ल्याने बहुतांशी आजार गुरांना होतात. त्यामुळे होणाऱ्या नुकसानीपासून वाचण्यासाठी खाद्याची तपासणी करून घेणे फायद्याचे असते. या लेखात आपण बुरशी टाळण्यासाठी खाद्याची तपासणी किती महत्त्वाचे आहे याबद्दल जाणून घेणार आहोत.
हेही वाचा : दुग्धव्यवसाय करणाऱ्यांसाठी खूशखबर; चारा बीटमुळे होईल दुधाच्या उत्पादनात वाढ
बऱ्याचदा बुरशी युक्त खाद्य खाल्ल्यामुळे अफ्लाटॉक्सिनच्या सततच्या आहारात येण्यामुळे जनावरे आजाराला बळी पडतात. त्यामुळे जनावरांच्या प्रजनन क्षमतेवर वाईट परिणाम संभवतो. जनावरांच्या दूध उत्पादनात घट होते व दुधाची गुणवत्ता घसरते. त्यामुळे खाद्यातील बुरशीचा प्रादुर्भाव ओळखण्यासाठी खाद्याची तपासणी करणे आवश्यक असते. जनावरांना बुरशीयुक्त चारा खायला दिल्यामुळे बऱ्याच प्रकारचे आजार जनावरांना होत असतात. घातक विषारी पदार्थांचे अंश दुधात येऊन असे दूध जर सेवन केले तर सेवन करणार्यांना सुद्धा अशा प्रकारच्या दुष्परिणामांचा सामना करावा लागतो. बुरशीपासून तयार होणारे आफ्लाटॉक्सिन हे जनावरांच्या तसेच मानवी आरोग्यालाही घातक ठरू शकतात.
बुरशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काय करता येतील उपाय
- खाद्याची तपासणी- जनावरांचा हिरवा चारा, सुका चारा व पशुखाद्य देण्यापूर्वी त्याची योग्यप्रकारे तपासणी करून घ्यावी.
- जनावरांना दररोज ताजा ओला चारा द्यावा. परंतु बऱ्याचवेळेस नैसर्गिक किंवा इतर कारणांमुळे असे करणे शक्य होत नाही. चारा साठवताना तो उभा करून ठेवावा जेणेकरून त्यामध्ये हवा खेळती राहील. चारामध्ये उष्णता निर्माण होऊन त्यामुळे बुरशी होणार नाही याची काळजी घ्यावी.
- सुका चारा साठवताना तो पूर्णपणे सुकलेला असावा. चारा साठवण यापूर्वी तो पूर्णपणे सुकलेला असावा.. पावसाळ्यात साठवलेला सुका चारा भिजू नये म्हणून ज्याप्रमाणे वरून चारा झाकला जातो. त्याप्रमाणे वरच्या साईडने सुद्धा चारा व्यवस्थित झाकावा.
- बरेच पशुपालक मका स्वस्त असल्याने मक्याचे भरड जनावरांना खायला घालतात. परंतु मका साठविताना मका व्यवस्थित वाळला आहे की नाही याची खात्री करून घेणे कधीही फायद्याचे असते. चांगल्या गुणवत्तेच्या पेंडींचा वापर करावा. पेंडीची साठवणूक कोरडा जागीच करावी.
- पशुखाद्यातील आफ्लाटॉक्सिंचे प्रमाण पुरवठादारांकडून पशुखाद्य खरेदी करण्यापूर्वी तपासून घ्यावे. तसेच पशुखाद्यातील आफ्लाटॉक्सिंचे प्रमाण दिलेल्या प्रमाणापेक्षा जास्त असू नये, याची खात्री करून घेणे आवश्यक असते.
हेही वाचा : वाह ! Mobile App द्वारे पशुपालकांना मिळणार चाऱ्याची माहिती
- काही कारखान्यांमध्ये किण्वन प्रक्रियाद्वारे बार्ली किंवा स्टार्च किण्वन प्रक्रियेतून तयार होणारे उपपदार्थ बऱ्याच प्रमाणात जनावरांना आहार म्हणून वापरले जातात. हा आहार देताना तो योग्यवेळेत व ताजा असतानाच देणे आवश्यक असते. परंतु बऱ्याच वेळेस हा आहार जनावरांना ताजा दिला जात नाही, असा आहार दोन ते तीन दिवसांनी कधी-कधी तर ८ दिवसांनी सुद्धा दिला जातो. त्यामुळे या खाद्यावर पांढऱ्या बुरशीची थर जमा होतो त्यामुळे असा आहार देणे हे अपायकारक असू शकते. आशा आहारातून विषबाधा होऊन जनावरे दगावण्याची शक्यता अधिक बळावते.
- पशुखाद्य साठविताना त्याचा जमिनीशी संपर्क येईल असे न ठेवता. खाली फळ्या किंवा प्लेट्स ठेवाव्यात पशुखाद्य जमिनीला किंवा भिंतीला चिटकुन ठेवता. हवा खेळती राहण्यासाठी भिंतीपासून एक फूट अंतरावर ठेवावे. जेणेकरून भिंतीमधील ओलसरपणा पशुखाद्य लागल्यामुळे बुरशीचे होणारी वाढ टाळली जाते.
- बऱ्याच वेळेस काळजी घेऊन सुद्धा किंवा बुरशी दिसत नसल्यामुळे आफ्लाटॉक्सिंचा काही भागात जनावरांच्या पोटात जाण्याची शक्यता बळावते. यासाठी आपण टॉक्सिन बाईंडरचा वापर करू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे बाईंडर आहारातून आलेल्या आफ्लाटॉक्सिंला शेणातून बाहेर टाकण्यास मदत करतात. वरीलप्रमाणे जर आपण काळजी घेतली तर बुरशीचा होणारा प्रादुर्भाव टळून जनावरांना होणारा त्रास कमी होईल.
Published on: 25 September 2020, 04:30 IST