भारतात शेती (agriculture) व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. एवढेच नव्हे तर शेतीसोबत पशुपालन व्यवसायही मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र आधिक दूध उत्पादनासाठी अनेक शेतकरी नवनवीन प्रयोग करीत असतात. मात्र अयशस्वी ठरतात. आज आपण दूध उत्पादनावर घरगुती पद्धती जाणून घेऊया.
दूध वाढीसाठी मुरघास हा उत्तम चारा मानला जातो. मुरघास ही एक हिरवा चारा टिकवून ठेवण्याची उत्तम पद्धत आहे. हिरव्या चाऱ्यापासून मुरघास करताना काय काळजी घ्यावी? आणि कोणत्या चारा पिकांचा समावेश करावा? याविषय़ी आपण सविस्तर जाणून घेऊया.
शेतकऱ्यांच्या चिंतेत भर; या जिल्ह्यात लम्पीने 10 जनावरांचा मृत्यू तर 110 जनावरे बाधित
जनावरांची कार्यक्षमता टिकविण्यासाठी आणि दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी त्यांना वर्षभर हिरवा चारा पुरविणे आवश्यक असते. विशेषतः दुभत्या व कामाच्या जनावरांना हिरव्या वैरणीची अत्यंत आवश्यकता असते. चारा वाळवताना सूर्याच्या उष्णतेमुळे त्यातील काही अत्यंत महत्त्वाचे अन्नघटक नाहीशे होतात.
खरीप हंगामात हिरवा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो. त्यानंतर हिरव्या चाऱ्याची कमतरता भासू लागते. जास्तीचा चारा वाळवून ठेवला जातो. इतर काळात विशेषतः उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याचा तुटवडा भासतो.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी खुशखबर; सोयाबीन पिकासाठी तब्बल ४० कोटी ७१ लाख रुपयांचा निधी मंजूर
मुरघास बनविण्यासाठी या चारा पिकांचा करा समावेश
सर्व तृणधान्य चारापिकापासून उत्तम मुरघास तयार होतो. ज्वारी आणि मका हा चारा तर उत्तमच मानला जातो. परंतु उसाचे वाढे, बाजरी, नागली, गिनीगवत, हत्तीगवत, पॅरागवत इत्यांदी चारा पिकापासूनही चांगला मुरघास तयार होतो.
महत्वाच्या बातम्या
भारताकडून तांदूळ निर्यातीवर बंदी; तांदळाच्या किमतीत 10% टक्क्यांनी वाढ
सावधान! पुढच्या 24 तासात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता; हवामान विभागाचा इशारा
देशी बटाट्याची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर; 'या' पद्धतीचा वापर केल्यास मिळणार दुप्पट उत्पन्न
Published on: 23 October 2022, 02:04 IST