Animal Husbandry

भारतात दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. शेतकरी चांगल्या उत्पादनासाठी जनावरांच्या आहाराकडे लक्ष देत असतात, तरीही उत्पादनात घट जाणवत असते. त्यामुळे योग्य संतुलित आहार कसा दिला पाहिजे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Updated on 19 October, 2022 12:00 PM IST

भारतात दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. शेतकरी (farmers) चांगल्या उत्पादनासाठी जनावरांच्या आहाराकडे लक्ष देत असतात, मात्र तरीही उत्पादनात घट जाणवत असते. त्यामुळे योग्य संतुलित आहार कसा दिला पाहिजे? याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

चांगल्या उत्पादनासाठी संतुलित आहार (Animal Balanced Diet) आणि आरोग्य व्यवस्थापन (Health Management) खूप महत्वाचे आहे. लम्पी स्कीन आजार तसेच इतर विषाणूजन्य आजारांचा प्रादुर्भाव दूध उत्पादकांसाठी नुकसानीचे ठरते.

हे विषाणू आपले प्रारूप सातत्याने बदलून जनावरांच्या शरीरातील रोगप्रतिकार क्षमता कमी करतात. एकदा का जनावरांमध्ये विषाणूजन्य आजारांचा प्रादुर्भाव झाला, की त्यानंतर दूध उत्पादनात झालेली घट लवकर भरून येत नाही.

म्हणूनच लम्पी स्कीन, लाळ्या खुरकूत, तसेच इतर विषाणूंद्वारे होणाऱ्या आजारांपासून बचाव करण्यासाठी आपल्या गाई म्हशींची रोगप्रतिकार क्षमता विविध वातावरणातील बदलांत टिकवून ठेवणे आवश्यक ठरते. विषाणूजन्य आजार हे वासरांच्या मृत्यूसही कारणीभूत ठरतात.

LIC ची नवीन योजना लाँच; फक्त एकाच गुंतवणुकीवर मिळणार १० पट संरक्षण कव्हर

गाय, म्हैस विण्याअगोदर ३ आठवडे आणि व्यायल्यानंतर ३ आठवडे असा एकूण ६ आठवड्यांच्या संक्रमण काळात कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती जनावरांना विविध आजारांचा प्रादुर्भाव होण्यास कारणीभूत ठरत असते. त्यामुळे याची काळजी घेणे गरजेचे ठरते.

यासाठी जनावरांचे आरोग्य आणि नैसर्गिक (Health and natural) रोगप्रतिकारक्षमता टिकवून ठेवणे, लसीकरण करणे, आहारातील विशेष घटक, गोठ्याचे व्यवस्थापन, वासरांची योग्य काळजी याकडे लक्ष देणे आवश्यक ठरते. रोगप्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना गरजेच्या आहेत. याविषयी जाणून घेऊया.

महत्वाची बातमी! तब्बल 19 खतांच्या विक्रीवर राज्यात बंदी; खते खरेदी न करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

संतुलित आहार

गाय किंवा म्हशीला तिच्या वजनाच्या ३ टक्के इतका कोरडा चारा एका दिवसात दिला पाहिजे. हा चारा कमी पडल्यास जनावरांचे वजन कमी होत जाऊन रोगप्रतिकारशक्ती कमी होते. म्हणजेच ४०० किलो वजन असलेल्या आणि १० लिटर दूध देणाऱ्या गायीला एकूण १२ किलो पाणी विरहित चारा खाद्य, तसेच इतर घटक दिले गेले पाहिजे.

कॅल्शिअम

जनावरांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण (Calcium content) योग्य असणे अत्यंत गरजेचे असते. शरीरातील अनेक जैवरासायनिक क्रिया सुरू ठेवण्यासाठी, स्नायूंचे काम त्यांचे आकुंचन-प्रसरण, संप्रेरकांचे काम, पेशींमधून आत जाणाऱ्या व बाहेर पडणाऱ्या घटकांवर इतर अन्न घटकांच्या साह्याने नियंत्रण ठेवणे, विकर कार्यक्षमता वाढविणे इत्यादी कामे कॅल्शिअममुळे सुरळीत होतात.

या सर्व क्रिया जनावरांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरतात त्यामुळे जनावरांच्या आहारात पूरक कॅल्शिअम देणे गरजेचे असते. शेवगा पाला, खनिज मिश्रण यामध्येही चांगल्या प्रमाणात कॅल्शिअम उपलब्ध होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी शक्यतो या चाऱ्याचा वापर करावा.

महत्वाच्या बातम्या 
शेतकऱ्याची कमाल! बिबीएफ तंत्राद्वारे घेतोय लाखों रुपयांमध्ये उत्पन्न; जाणून घ्या पद्धती
सोयाबीन दर अजूनही स्थिर; बाजारभाव वाढणार का? जाणून घ्या आजचे दर
पुढचे 2 दिवस सूर्य 'या' राशीच्या लोकांचे नशीब उजळवणार; जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य

English Summary: Farmers increase immunity providing proper feed animals good benefit
Published on: 19 October 2022, 12:00 IST