Animal Husbandry

ग्रामीण भागात शेतकरी शेतीसोबत अनेक व्यवसाय करत असतात. यामधीलच व्यवसाय म्हणजे कुक्कुटपालन व्यवसाय. हा व्यवसाय प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी केला जातो. यामधून शेतकरी अंडी व्यवसाय करून चांगला पैसा कमवू शकतात. अशाच भरपूर अंडी देणाऱ्या कोंबडी विषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

Updated on 27 September, 2022 10:45 AM IST

ग्रामीण भागात शेतकरी शेतीसोबत अनेक व्यवसाय करत असतात. यामधीलच व्यवसाय म्हणजे कुक्कुटपालन व्यवसाय. हा व्यवसाय प्रत्येक शेतकऱ्याच्या (farmers) घरी केला जातो. यामधून शेतकरी अंडी व्यवसाय करून चांगला पैसा कमवू शकतात. अशाच भरपूर अंडी देणाऱ्या कोंबडी विषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

अनेकदा शेतकऱ्यांना समजत नाही की त्यांनी कोणत्या जातीची कोंबडी पालन करावे, आज आपण अशाच एका कोंबडीच्या जातीविषयी माहिती जाणून घेणार आहोत, जी तुम्हाला चांगला नफा देऊ शकते.

एका वर्षात जवळपास 270 अंडी घालण्याची क्षमता

प्लायमाउथ रॉक कोंबडी (Plymouth Rock hen) शेतकऱ्यांना चांगला नफा देऊ शकतात. माहितीनुसार ही कोंबडी एका वर्षात 250 ते 270 पर्यंत अंडी घालू शकतात. या कोंबडीच्या एका अंड्याचे जवळपास वजन 60 ग्रॅम पर्यंत असते. या कोंबडीचे वजन ३ किलोग्रॅमपर्यंत आहे.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! हरभरा, ज्वारी, करडईच्या बियाण्यांवर मिळणार 'इतके' अनुदान

विशेष विशेष म्हणजे कोंबडीची चोच (hen beak)आणि कान लाल असतात, तर चोच पिवळी असते. या कोंबडीला अमेरिकन जात मानली जाते. परंतु भारतातील अनेक राज्यांमध्ये ते मुबलक प्रमाणात आढळते. शेतकऱ्यांसाठी व्यवसायाच्या दृष्टीने प्लायमाउथ रॉक कोंबडी भारतात खूप चांगली मानली जाते.

शेतकऱ्यांना 'या' 12 योजनेतून मिळणार 75 टक्के अनुदान; 83 लाख रुपयांचा निधी जाहीर

कमी दिवसात चांगला पैसा कमवू शकता

महत्वाचे म्हणजे प्लायमाउथ रॉक चिकन भारतातील प्रत्येक राज्यात पाहायला मिळेल. ज्याला रॉक बॅरेड रॉक (Rock Barred Rock) असेही म्हणतात. त्याचे चिकन मांस देखील अतिशय चवदार आणि आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर मानले जाते. यामुळेच बाजारात त्याच्या मांसाची किंमत खूप जास्त आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना प्लायमाउथ रॉक जातीची कोंबडी खूप फायदेशीर आणि नफा देणारी ठरू शकेल.

महत्वाच्या बातम्या 
रेशनकार्डधारकांसाठी महत्वाची बातमी; मोफत रेशनबाबत मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय
कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
सावधान! शेळ्या-मेंढ्यांमध्ये वाढतोय न्यूमोनिया आजार; करा वेळीच उपाय

English Summary: Farmers earn money short period time Plymouth Rock Chickens
Published on: 27 September 2022, 10:45 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)