Animal Husbandry

गेल्या काही दिवसांपासून राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. असे असताना दूध दरात वाढ होताना दिसत आहे. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत आहे.

Updated on 21 October, 2022 12:07 PM IST

गेल्या काही दिवसांपासून राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. असे असताना दूध दरात वाढ होताना दिसत आहे. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत आहे.

आता वारणा दूध संघ शेतकर्‍यांना गायीच्या खरेदी दुधास प्रतिलिटर 3 रुपये तर म्हैस दूध खरेदीस प्रतिलिटर 2 रुपये दरवाढ देण्याची घोषणा केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. संघाचे अध्यक्ष, आमदार डॉ. विनय कोरे व कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी याबाबत माहिती दिली.

सध्या शेतकऱ्यांची पिके मुसळधार पावसामुळे वाहून गेली आहेत. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. यामुळे आताऐन दिवाळी सणाच्या तोंडावर ही दरवाढ मिळाल्याने दूध उत्पादक शेतकर्‍यांतून समाधानाचे वातावरण आहे.

सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी स्थिती नाही- कृषीमंत्र्यांची माहिती

सध्या राष्ट्रीय स्तराबरोबरच जागतिक बाजारपेठेत दूध आणि दुग्धजन्य पदार्थाची मागणी वाढली आहे. तसेच लंपी सारख्या आजारामुळे अनेक जनावरांचे निधन झाले आहे. यामुळे काहीसा तुटवडा जाणवत आहे. गेले अनेक दिवस दूध उत्पादकांना वैरण टंचाईसह अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

त्यांना आर्थिक झळ बसू नये म्हणून वारणा दूध संघाने शेतकर्‍यांना पाठबळ दिले आहे. यामुळे शेतकरी समाधानी आहेत. तसेच शेतकऱ्यांना मदत म्हणून संघाने दीड लाखांवर जनावरांना मोफत लम्पी स्किन प्रतिबंधक लस दिली आहे.

कोल्हापूरमध्ये भारतातील सर्वात मोठे अंडे! कोंबडीने घातले 210 ग्रॅम वजनाचे अंडे..

तसेच अमृत पशुधन सुरक्षा कवच योजनेतूंन 30 लाख रुपयांचे अनुदान दूध उत्पादकांना दिले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मदत होत आहे. सध्या वेगवेगळे उपक्रम राबविले जात असल्याचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो काळजी घ्या! शेतातील विजेच्या तार आणि ट्रान्सफॉर्मर ऑईल चोरीच्या घटना वाढल्या...
'त्या' कारखान्यांना ऊस तोडणेसाठी अडथळा आणू नये, राजू शेट्टी यांचे कार्यकर्त्यांना आदेश
भोंग्याचा आवाज झाला आणि सभासदांनी जल्लोष केला! अखेर भीमा पाटस सुरू होणार

English Summary: Farmers' cow milk price hiked by Rs 3 and buffalo price by Rs 2
Published on: 21 October 2022, 12:07 IST