Animal Husbandry

भारतात ग्रामीण भागात शेती (agriculture) मोठ्या प्रमाणात केली जाते. खेड्या-पाड्यातील शेतकरी शेतीसोबत जोडव्यवसाय म्हणून पशूपालनाचा व्यवसाय करून आपल्या जीवनाचा आर्थिक भार चालवत असतात.

Updated on 15 September, 2022 2:44 PM IST

भारतात ग्रामीण भागात शेती (agriculture) मोठ्या प्रमाणात केली जाते. खेड्या-पाड्यातील शेतकरी शेतीसोबत जोडव्यवसाय म्हणून पशूपालनाचा व्यवसाय करून आपल्या जीवनाचा आर्थिक भार चालवत असतात.

मात्र पशुपालन व्यवसाय करीत असताना शेतकऱ्यांना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. शेतकरी (farmers) पशुपालन करून दूध उत्पादनात चांगला फायदा करून घेत असतात. चांगल्या दुधासाठी देशी गायी अव्वल ठरत असते.

कित्येक शेतकरी आपल्या गायींच्या वासरांची काळजी घेऊन त्यांची गायी बनवत असतात. देशी गाय पाळायला आणि दुधालाही चांगली मानली जाते. मात्र यासाठी वासरांची वाढ होणे तितकेच गरजेचे असते.

वासरांची वाढ खुंटते या समस्येला कित्येक शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. याची नेमकी कारणे कोणती? याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया.

LIC ची नवीन योजना लाँच; फक्त 5 हजार रुपयांमध्ये जबरदस्त फायदे आणि बोनसही

वासरांची वाढ या कारणाने खुंटते

बहुतांशी पशुपालकांकडे (Cattle breeder) निकृष्ट चारा उपलब्ध असतो आणि केवळ अशा चाऱ्यावर वासरांची पूर्ण क्षमतेने वाढ होत नाही. वासरांच्या जलद वाढीसाठी प्रथिनयुक्त आहाराची गरज असते.

वासरांच्या शरीरातील जंत रक्त पितात, वासराने पचवलेले अन्न खातात. आतड्यांना इजा करतात त्यामुळे पचवलेले अन्नसुद्धा वासरांच्या शरीरात नीट शोषले जात नाही, परिणामी वाढ खुंटते. गोचिड, पिसवा, उवा वासराचे रक्त पिऊन वाढतात. त्यामुळे चारा खाण्यावरील लक्ष कमी होऊन त्यांचे कुपोषण होऊन वाढ खुंटते.

शेतकऱ्यांनो 'या' योजनेतून दरमहा मिळवा 3 हजार रुपये; सरकार देतंय पेन्शन

गोठ्यातील इतर गाई/ म्हशी (Cow/ buffalo) लहान वासरांना चारा, खाद्य खाऊ देत नाहीत त्यामुळे त्यांचे कुपोषण होऊन वाढ खुंटते. वासरांना एकेठिकाणी दोरीने बांधल्यामुळे वासरांच्या शरीरावर एक प्रकारचा सतत ताण येतो. शरीराचा व्यायाम न झाल्यामुळे पचनक्षमता कमी होऊन वाढ खुंटते.

महत्वाच्या बातम्या 
राज्यातील बाजार समित्यांमध्ये किती मिळतोय सोयाबीनला भाव? जाणून घ्या
सावधान! ॲसिडिटीचा सतत त्रास होतोय? तर हृदयविकाराची असू शकतात लक्षणे...
आनंदाची बातमी! गोगलगायींमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ९८ कोटी रुपयांची मदत जाहीर

English Summary: Farmer friends growth calves stunted Take care
Published on: 15 September 2022, 02:40 IST