Animal Husbandry

पी. आर पोटे-पाटील कृषी महाविद्यालय अमरावती व धेनू ॲप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दि. २८, २९ व ३१ ऑगस्ट दरम्यान तीन दिवसीय ऑनलाईन डिजिटल उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये पी. आर. पोटे-पाटील कृषी महाविद्यालयातील शेवटच्या वर्षातील विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच शिक्षक मोठया संख्येने सहभागी झाले होते.

Updated on 01 September, 2023 2:17 PM IST

पी. आर पोटे-पाटील कृषी महाविद्यालय अमरावती व धेनू ॲप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दि. २८, २९ व ३१ ऑगस्ट दरम्यान तीन दिवसीय ऑनलाईन डिजिटल उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये पी. आर. पोटे-पाटील कृषी महाविद्यालयातील शेवटच्या वर्षातील विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच शिक्षक मोठया संख्येने सहभागी झाले होते.

या प्रशिक्षण कार्यक्रमाचा मुख्य उद्देशच असा होता की, ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाबरोबरच डिजिटल उद्योजकता समजावी व आपल्या मोकळ्या वेळेचा सदुपयोग करून घरबसल्या आपल्या मोबाईलद्वारे डिजिटली उद्योग, व्यवसाय करता यावा, या उद्देशाने धेनू टेक सोल्युशन्स प्रा.लि या कंपनीने सुशिक्षित बेरोजगार, तरुणांना तसेच शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देण्याचे डिजी मार्ट मॉडेल विकसित केले आहे.

ग्रामीण भागातील पशुपालकांना डिजिटली दर्जेदार वस्तू व सेवा उपलब्ध करून देण्यासाठी हे डिजी मार्ट मॉडेल अधिक फायदेशीर ठरले आहे. या डिजी मार्टच्या माध्यमातून कित्येक ग्रामीण भागातील तरुण युवकांना तसेच विद्यार्थ्यांना रोजगार मिळण्याचे संकेत आहेत.

तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात धेनूच्या डिजिटल उद्यमिता प्रशिक्षणास उत्स्फूर्त प्रतिसाद

या डिजिटल उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन कृषी महाविद्यालयातील पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विषयाचे सहाय्यक प्राध्यापक श्री. मदन जाधव सर यांच्या हस्ते पार पडले तसेच डिजिटल उद्योजकता या कार्यक्रमादरम्यान, डिजिटल व्यवसाय व संधी, डिजिटल मार्केटिंग, डिजिटल प्रमोशन, तसेच डिजिटल बिजनेस स्ट्रॅटेजी, रोजगार निर्मितीचे धेनू डिजि मार्ट मॉडेल यासारख्या विविध विषयावर श्री. श्रीनाथ नलगोटले, श्री. किरण पवार, श्री. दीपेश धोडी, तसेच धेनू कंपनीचे डिजिटल बिजनेस मॅनेजर श्री. नितीन पिसाळ इत्यादी मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले.

या कार्यक्रमादरम्यान डिजिटल उद्योजकता या विषयावर आधारित स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये अती उत्कृष्टरित्या सहभाग नोंदवलेल्या विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये किंमतीचा मार्ट प्लॅन, ट्रॉफी तसेच सहभाग प्रमाणपत्र हे बक्षीस कार्यक्रमादरम्यान लवकरच वितरित केले जाणार आहे.

पशुसंवर्धन विभाग व धेनू ॲप आयोजित, दुग्धव्यवसायातील नवतंत्रज्ञानातून सामाजिक बदल कार्यशाळा संपन्न...

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सौ. समृद्धी काळे यांनी केले. तसेच हा कार्यक्रम कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धेनूची सर्व टीम तसेच पी.आर पोटे-पाटील कॉलेज चे प्राचार्य डॉ. वैभव लाजूकर सर तसेच इतर प्राध्यापक वृंद व श्री. मदन जाधव सर यांचे विशेष सहकार्य लाभले.

जनावरांच्या आहारात बुरशीयुक्त चारा येण्याची प्रमुख कारणे

English Summary: Dhenu's digital entrepreneurship training program concluded at PR Pote-Patil Agricultural College...
Published on: 01 September 2023, 02:15 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)