Animal Husbandry

एका गाईने एका खाटिकाला भयंकर शिक्षा दिली आहे. ज्या दोरीने तिला बांधले होते, त्याच दोरीने तिने खाटिकाला फरफटत नेल्याचे समोर आले आहे (Cow dragged butcher). यामुळे अनेकांनी खाटिकाला दोषी मानले आहे.

Updated on 13 July, 2022 1:55 PM IST

अनेकदा आपण बघतो की गाई हा शांत प्राणी म्हणून ओळखला जातो. मात्र तिला इजा करण्याचा प्रयत्न केला तर मात्र अनेकदा ते अंगलट देखील येते. जेव्हा वेळ येते, तेव्हा ती सुद्धा रूद्र रूप धारण करू शकते. याची प्रचिती नुकतीच आली. यामुळे हा विडिओ सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे. या विडिओमध्ये एका गाईने एका खाटिकाला भयंकर शिक्षा दिली आहे. ज्या दोरीने तिला बांधले होते, त्याच दोरीने तिने खाटिकाला फरफटत नेल्याचे समोर आले आहे (Cow dragged butcher). यामुळे अनेकांनी खाटिकाला दोषी मानले आहे.

खाटिकाला आपल्यासोबत रस्त्यावर खेचत, फरफटत अगदी दूरपर्यंत नेलं. हा खाटिक गाईला खेचण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे गाय इतकी संतप्त झाली की तिने त्यालाच खेचलं. व्हिडीओत पाहू शकता, गायीला दोरीने बांधून तिला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र ते शक्य झाले नाही. त्याच्या सोबतीला अजून चारपाच लोक होती. मात्र सगळ्याचे प्रयत्न अपुरे पडले.

यावेळी गाईला पकडण्याच्या नादात एक व्यक्ती गाईला बांधलेल्या दोरीतच अडकला आहे. गाय त्याला तसंच खेचत घेऊन जाताना दिसते. अनेकजण त्याची सुटका करण्यासाठी त्याच्या मागे पळत राहिले मात्र तरी देखील त्याची सुटका झाली नाही. काही अंतरावर तो खाटिक बेशुद्धावस्थेत रस्त्यावर पडलेला दिसतो. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

https://twitter.com/nasimasardar/status/1546391897157025792?s=20&t=KEWe1KQogqY9QTyb06kjfg

अनेकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. हा व्हिडिओ पाकिस्तानमधील कराचीच्या गुलिस्‍तान-ए-जौहर परिसरातील असल्याचे सांगितले जात आहे. अनेकजण गाईच्या मागे पळत असल्याने ही गाई अजूनच पुढे पळू लागली, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

महत्वाच्या बातम्या;
अवघडच झालं! पैसे वाटूनही सरपंचपदाची निवडणूक हरले, मतदारांकडून पुन्हा केली ४ लाखाची वसुली
याला म्हणतात खरी कृतज्ञता!! बेंदूर सणादिवशी बैलांचा त्रास कमी होण्यासाठी तयार केले अनोखे जुगाड
ब्रेकिंग! शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कमही आणि अतिवृष्टी झाल्यास अनुदानही, शेतकऱ्यांना सुखद धक्का

English Summary: cow gave the killer terrible punishment, tied rope with a nail
Published on: 13 July 2022, 01:55 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)