Animal Husbandry

अनेकदा पाळीव प्राण्यांवर वन्य प्राण्यांकडून हल्ले होत असतात. परंतु याबाबत शेतकर्यांना भरपाई कशी मिळवावी याबाबत कल्पना नसते. महाराष्ट्र शासनाने यासाठी महसूल व वनविभाग अंतर्गत११ नोव्हेंबर २०१६ रोजी शासन निर्णय काढलेला असून यामध्ये पाळीव प्राण्यांवर वन्य प्राण्यांकडून हल्ला झाल्यास भरपाई देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

Updated on 02 May, 2022 12:09 PM IST

अनेकदा पाळीव प्राण्यांवर वन्य प्राण्यांकडून हल्ले होत असतात. परंतु याबाबत शेतकर्यांना भरपाई कशी मिळवावी याबाबत कल्पना नसते. महाराष्ट्र शासनाने यासाठी महसूल व वनविभाग अंतर्गत११ नोव्हेंबर २०१६ रोजी शासन निर्णय काढलेला असून यामध्ये पाळीव प्राण्यांवर वन्य प्राण्यांकडून हल्ला झाल्यास भरपाई देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

वन्य प्राण्यांमध्ये वाघ, बिबट्या, अस्वल, गवा, रानडुक्कर, रानकुत्रे अश्या वन्यप्राण्यांचा समावेश आहे. या प्राण्यांच्या हल्ल्यात गाय-म्हैस, शेळी-मेंढी तसेच बैल यांचा मृत्यु झाल्यास पशुपालकांना भरपाई मिळू शकते.पण ही भरपाई कशी मिळवायची याबाबत अनेकांना माहिती नसते त्यामुळे पशुपालक शेतकरी या भरपाई पासून वंचित राहतात.

त्यामुळे आपण आज ही भरपाई कशी मिळवायची याबाबत माहिती घेणार आहोत.  प्रत्येक गावात वनसमिती स्थापन केलेली असते, आपण या वन समितीशी संपर्क करून याबाबत माहिती देऊ शकता त्यानंतर ही समिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करेल, किंवा आपण थेट वन अधिकाऱ्यांशी संपर्क करू शकता.

पशुपालकांनी जनावर मृत्यु पावल्यापासून ४८ तासांच्या आत वन समिती अथवा वन अधिकाऱ्यांशी संपर्क साधने गरजेचे आहे.  जंगली प्राण्याने ज्या ठिकाणी जनावर मारले आहे तेथे वन अधिकारी पंचनामा करत असतात व जनावराचा मृत्यू वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात झाला आहे कि नाही याबाबत तपास करत असतात त्यामुळे त्या ठिकाणाहून वनाधिकारी येईपर्यंत जनावरांचे शव हलवू नये.

जनावराचा ज्या ठिकाणी मृत्यु झाला असेल किंवा जखमी झाला असेल त्या ठिकाणापासून आजूबाजूच्या १० किलोमीटर अंतरापर्यंत विषामुळे कोणत्याही वन्य प्राण्याचा मृत्यु झालेला नसावा. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वनविभागाकडून आपल्याला जनावराची बाजार किमंत काढून नुकसान भरपाई आपल्याला दिली जाते.

महत्वाच्या बातम्या
Breaking: 'या' राज्यात वाढले दुधाचे दर; दूध उत्पादकांना मिळणार दिलासा
याला म्हणतात जिद्द!! वडील मजूर, स्वतः भाजीपाला विकला; नऊ वेळा अयशस्वी तरी देखील न खचता शेवटी जज बनलाच

English Summary: Compensation will be given by the forest department if wild animals attack pets
Published on: 02 May 2022, 12:09 IST