Animal Husbandry

कोरोनानंतर राज्यात जनावरांना लम्पी स्कीन हा आजार झाला. यामध्ये मोठ्या प्रमाणावर जनावरांचा मृत्यू झाला. यामुळे याचा फटका शेतकऱ्यांना बसला. असे असताना खबरदारी म्हणून गेल्या अडीच महिन्यांपासून जनावरांचे बाजार बंद आहेत.

Updated on 11 November, 2022 12:09 PM IST

कोरोनानंतर राज्यात जनावरांना लम्पी स्कीन हा आजार झाला. यामध्ये मोठ्या प्रमाणावर जनावरांचा मृत्यू झाला. यामुळे याचा फटका शेतकऱ्यांना बसला. असे असताना खबरदारी म्हणून गेल्या अडीच महिन्यांपासून जनावरांचे बाजार बंद आहेत.

असे असताना बंद असलेले जनावरांचे बाजार (Livestock Market) येत्या चार दिवसांत सुरू होणार आहेत. यामुळे आता लाखोंची उलाढाल पुन्हा एकदा सुरू होणार आहे. सध्या लम्पी स्कीन आजाराचे प्रमाण आटोक्यात येत आहे.

तसेच बहुतांश जनावरांना लसीकरण झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर बाजाराला परवानगी देण्यात येणार आहे. या बाबतचे परिपत्रक काढण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने (Animal Husbandry Department) विधी व न्याय विभागाला पाठवले आहे.

नंदूरबार बाजार समितीत मक्याला विक्रमी दर

यावर दोन दिवसांमध्ये निर्णय होणार आहे. जनावरांचे आठवडी आणि जत्रा- यात्रांमधील बाजार बंद करण्यात आले होते. राज्यात आतापर्यंत १४ हजार ६१२ गोवंशाचा मृत्यू झाला आहे. यामुळे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, मृत जनावरांना भरपाई देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. गायीसाठी ३०, बैलासाठी २५, तर वासरांचा मृत्यू झाल्यास १६ हजार रुपयांची भरपाई दिले जात होते. लसीकरण देखील मोठ्या प्रमाणावर झाले आहे.

कुस्तीगीर परिषदेवर पुन्हा शरद पवारांचाच दबदबा, भाजपला कोर्टाचा दणका

८ सप्टेंबरपासून जनावरांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली होती. तेव्हापासून खरेदी- विक्रीचे व्यवहार थंडावले होते. यामुळे याची व्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती.

संपूर्ण वाहतूक बंदी असल्याने म्हशींच्या खरेदी विक्रीला फटका बसला होता. शेतकऱ्यांना दुधाळ म्हशी खरेदी करण्यात मोठ्या अडचणी येत होत्या. यामुळे हे बाजार कधी सुरू होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पशुसंवर्धन आयुक्तालयाकडे ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर निवेदने येत होती.

महत्वाच्या बातम्या;
या भन्नात आयडीयामुळे मिरचीच्या कीड व्यवस्थापनाची चिंताच मिटली आहे
Aurangabad: कृषिमंत्र्यांच्याच तालुक्यात लम्पीचा कहर, सर्वाधिक जनावरे सिल्लोड तालुक्यात मृत्युमुखी
घ्यायक गाडी, पाण्याला जार आणि चहा, मजुरांना आलेत अच्छे दिन..

English Summary: cattle market start? Important information Animal Husbandry Department
Published on: 11 November 2022, 12:09 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)