Animal Husbandry

राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. सध्या दुधाला किफायतशीर रास्त भाव एफआरपी लागू करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती नेमली आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना लवकरच मोठा दिलासा मिळणार आहे. अनेक दिवसांपासून याबाबत मागणी केली जात होती.

Updated on 24 May, 2022 2:45 PM IST

राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. सध्या दुधाला किफायतशीर रास्त भाव एफआरपी लागू करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती नेमली आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना लवकरच मोठा दिलासा मिळणार आहे. अनेक दिवसांपासून याबाबत मागणी केली जात होती.

याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी उपसमितीच्या अहवालानंतर याबाबत निर्णय घेऊ, असे सांगितले होते. ज्याप्रमाणे उसाला किफायतशीर आणि रास्त भाव दिला जातो, त्याप्रमाणे दुधालाही एफआरपी मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. अधिवेशनात याबाबत मोठा राडा झाला होता. शेतकरी संघटना याबाबत आग्रही होत्या.

अखेर याबाबत समिती नेमण्यात आली आहे, यामध्ये उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली पशुसंवर्धन व दुग्ध विकासमंत्री सुनील केदार, कृषीमंत्री दादा भुसे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, मृदा व जलसंधारमंत्री शंकरराव गडाख, पशुसंवर्धन व दुग्ध विकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागाचे प्रधान सचिव, सहकार विभागाचे प्रधान सचिव सदस्य असतील तर दुग्ध व्यवसाय विभागाचे आयुक्त एच. पी. तुम्मोड हे सदस्य सचिव असणार आहेत.

"स्वतः कारखाना चालवण्याची वेळ येते तेव्हा सगळे मागे सरकतात, हा अनुभव मला आहे"

याबाबत 25 जून 2021 रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीत संघटनांच्या प्रतिनिधींनी ही मागणी लावून धरली होती. यामुळे दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांचे याकडे लक्ष लागले होते. अखेर आता या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या;
ऐतिहासिक शेतकरी संपाच्या गावात ठरली रणनीती, 7 दिवसाचा अल्टिमेटम, अन्यथा पुन्हा पेटणार आंदोलनाची मशाल
शेतकऱ्यांनो तापमानवाढीचा पशुधनावरील दुष्परिणाम, आणि उपाय जाणून घ्या
योगी सरकारचा मोठा निर्णय! घरातील एका सदस्याला मिळणार नोकरी, जाणून घ्या योजना

English Summary: Big news! Milk will get FRP, decision of Cabinet sub-committee
Published on: 24 May 2022, 02:43 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)