Animal Husbandry

जर शेळीपालन व्यवसायाचा विचार केला तर आपल्याला माहिती आहेच की, कमी खर्चात जास्त उत्पादन देणारा आणि हमखास चांगला नफा राहील असा हा व्यवसाय आहे. जर व्यावसायिक दृष्टिकोनातून शेळीपालन व्यवसाय करायचा राहिला तर सगळ्या प्रकारचे व्यावसायिक बारकावे तसेच व्यवस्थापनातील बारीक गोष्टी खूप महत्वाच्या असतातच.

Updated on 12 October, 2022 10:28 AM IST

जर शेळीपालन व्यवसायाचा विचार केला तर आपल्याला माहिती आहेच की, कमी खर्चात जास्त उत्पादन देणारा आणि हमखास चांगला नफा राहील असा हा व्यवसाय आहे. जर व्यावसायिक दृष्टिकोनातून शेळीपालन व्यवसाय करायचा राहिला तर सगळ्या प्रकारचे व्यावसायिक बारकावे तसेच व्यवस्थापनातील बारीक गोष्टी खूप महत्वाच्या असतातच.

परंतु शेळीपालनातील यशाची पहिली सुरुवात होते ती शेळ्यांच्या जातींची निवड यावरून होय. सहाजिकच आहे की जातिवंत शेळीच्या जातींची निवड केली तर या शेळ्या पासून मिळणारे उत्पादन देखील चांगले मिळते.

त्यामुळे शेळ्यांच्या ज्या काही जाती आहेत, त्यामधून योग्य जातींची निवड करणे तितकेच गरजेचे असते. त्यामुळे या लेखामध्ये आपण शेळीच्या एका महत्त्वपूर्ण आणि चांगल्या उत्पादनक्षम जातीची माहिती घेणार आहोत.

नक्की वाचा:Animal Rearing: शेतकरी बंधूंनो! शेळीपालनापेक्षा मेंढीपालन हा व्यवसाय कसा आहे फायदेशीर? याबद्दल वाचा डिटेल्स

 बारबेरी जातीची शेळी देईल चांगले उत्पादन

 जर आपण शेळीपालनाचा विचार केला तर कमी खर्चात जास्त उत्पादन देण्याची योजना असेल तर बारी जातीची शेळी तुमच्या साठी खूप महत्त्वाची ठरू शकते. जवळजवळ 11 महिन्यात ही शेळी प्रजननाला तयार होते.

या शाळेचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही शेळी जास्त करून दोन किंवा तीन करडांना जन्म देण्यास सक्षम आहे. जर या शेळी बद्दल अधिक माहिती घेतली तर ही आफ्रिकेतील बार्बरा या ठिकाणाहून भारतात आणली गेली असून तिला बारबरी असे नाव पडले आहे.

Fish Farming: शेतकरी बंधूंनो! नेमकी काय आहे एकात्मिक मत्स्यशेतीची संकल्पना? शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

तसेच ज्या शेळीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही थंड आणि उष्ण अशा दोन्ही हवामान प्रकारात चांगली तग धरते व वाढते. माती शेळीचे वजन 20 ते 30 किलोपर्यंत असते व दररोज एक लिटर दूध देण्याची क्षमता आहे. बारबरी जातीची शेळी खूप वेगाने विकसित होते व तिच्या उत्तम प्रजननक्षमतेमुळे एका वर्षात कळपातील शाळांच्या संख्येत चांगलीच वाढ होते.

मांस उत्पादनासाठी ही शेळी खूप महत्त्वाचे आहे. बारी जातीचा बोकड आणि बकरीच्या मांसाला बाजारपेठेत चांगली मागणी असते. त्यामुळे शेळी पालन करणारे शेतकरी या जातीच्या शेळ्या पालन करून चांगला नफा मिळवू शकता.

नक्की वाचा:Goat Rearing: 'या' तीन जातींच्या शेळ्या देतील शेळीपालनात आर्थिक समृद्धी, वाचा या जातींविषयी डिटेल्स

English Summary: barberi is species of goat is so profitable for goat rearing and give more income to farmer
Published on: 12 October 2022, 10:28 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)