सध्या शेतकऱ्यांसाठी सरकारने पशुपालनाबाबत नवी एक योजना आणली आहे. आपल्या देशात शेतीसोबतच परंपरागत पशुपालन केले जाते. अशा परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांना शेतीसोबतच पशुसंवर्धनाच्या कामाला चालना देत आहे.
यासाठी शासनाने पशु किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केली आहे. यामध्ये शेतकरी गाई-म्हशींवर कर्ज मिळणार आहे. यासोबतच शेतकऱ्यांना शेळीपालन किंवा कुक्कुटपालनासाठी बँकेकडून कर्ज देण्याची सुविधा देण्यात आली आहे.
या योजनेत तुम्हाला १ लाख ८० हजार रुपयांचे कर्ज केवळ ४ टक्के व्याजावर कोणत्याही हमीशिवाय दिले जाणार आहे. या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी बांधव जनावरे खरेदी करू शकतात.
यासाठी तुम्हाला बँकेकडे अर्ज करावा लागेल. अर्जासाठी तुम्हाला आवश्यक ती कागदपत्रे जमा करावी लागतात. याची पूर्तता करावी लागते.
डाळींबाची कोण जात शेतकऱ्यांसाठी उपयुक्त, जाणून घ्या..
यामध्ये अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र, मोबाईल क्रमांक, पासपोर्ट साईज फोटो, प्राणी आरोग्य प्रमाणपत्र, पशु विमा प्रमाणपत्र याशिवाय बँक तुमचा क्रेडिट स्कोर देखील तपासून कर्जाची रक्कम ठरवू शकते.
मोठी बातमी! चिंदरमध्ये विषबाधेने ४१ जनावरांचा मृत्यू...
नव्या शेततळ्यांसाठी ४६ कोटींचा निधी, शेतकऱ्यांना होणार फायदा
मला न विचारता टोमॅटो का वापरले.? बायकोला आला राग आणि नवऱ्याला सोडून गेली माहेरी....
Published on: 15 July 2023, 02:14 IST