भारत हा कृषिप्रधान देश असून भारतातील बहुसंख्य शेतकरी शेती सोबत पशुपालन व्यवसाय करतात. पशुपालन व्यवसाय मध्ये दूध उत्पादन हा शेतकऱ्यांचा प्रमुख उत्पन्नाचा स्त्रोत आहे.
परंतु दूध उत्पादन वाढीसाठी जातिवंत गाई किंवा म्हशींची निवड खूप महत्त्वाचे आहे. या दृष्टिकोनातून विचार केला तर कृत्रिम रेतनाचा प्रयोग हा पशुपालना मधील एक मैलाचा दगड ठरू पाहतो आहे. हे तंत्रज्ञान उच्च गुणवत्ता असलेल्या दूध उत्पादन करणाऱ्या प्राण्यांची संख्या वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. यासाठी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्रालय कृत्रिम रेतनासाठी प्रोत्साहन देत असून त्या दृष्टिकोनातून पशुसंवर्धन मंत्रालयाकडून महाराष्ट्र गोकुळ मिशन देखील चालवण्यात येत आहे. केंद्र सरकार असो कि विविध राज्य सरकारे हे शेतकऱ्यांच्या बाबतीत कृषी आणि पशुसंवर्धनावर विशेष भर देत आहे. ज्या माध्यमातून पशुधनाचा मध्ये कृत्रिम रेतनाला प्रोत्साहन देण्यात येत आहे. परंतु अजून देखील अनेक पशुपालक जनावरांमध्ये कृत्रिम रेतन करत नाहीत किंवा अनेकांच्या मनात शंकाकुशंका आहे. त्यामुळेया लेखामध्ये कृत्रिम रेतनाचे फायदे जाणून घेऊ.
कृत्रिम रेतनात एक डोस गर्भधारणा साठी पुरेसा
कृत्रिम रेतनाद्वारे गाईला गर्भधारणा करायचे असेल तर फ्रिजर वीर्य वापरले जाते. ज्यामध्ये प्राण्यांमध्ये उष्णता सुरू होते तेव्हा 0.25 मिली क्षमतेचा फ्रीजर विर्याचा डोस एखाद्या प्राण्याच्या यशस्वी गर्भधारणेसाठी पुरेसा असतो व अशा प्रकारचा डोस हा प्रशिक्षित तंत्रज्ञाकडून कडून देण्यात येतो. तसेच कृत्रिम रेतन यामध्ये जनावरांना उष्णता दिल्यानंतर डोस देण्यासाठी योग्य वेळ निवडणे खूप महत्त्वाचे असते.याअंतर्गत ही मात्रा व त्यांच्या आगमनानंतर 12 ते 18 तासापर्यंत दिली जाऊ शकते. चोवीस तासानंतर दुसरे गर्भाधान आवश्यक असते.
जातिवंत पशूंच्या जन्मासाठी आवश्यक
देशात उच्च आणि जातिवंत पशूंची संख्या वाढण्यासाठी कुत्रिम रेतन खूप महत्त्वाचे आहे. यासाठी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्रालयाकडून राष्ट्रीय गोकुळ मिशन चालवण्यात आले आहे. गाईला जर गर्भधारणा करायची असेल तर चांगल्या जातीच्या बैलाची व्यवस्था करण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर असते. यावर सगळ्यात महत्वाचा आणि सर्वोत्तम उपाय म्हणजे कृत्रिम गर्भाधान हे होय. तसेच कृत्रिम रेतनाच्या माध्यमातून एकच बैलाचा वापर करून वर्षाला वीस हजार पेक्षा अधिक गाईंचे प्रजनन करता येते.
कृत्रिम रेतन आणि नैसर्गिक गर्भाधान बाबतीत शेतकऱ्यांच्या शंका-कुशंका
कृत्रिम रेतन नैसर्गिक रेतनापेक्षा पूर्ण वेगळे आहे. नैसर्गिक वेतनामध्ये गाईला बैलाकडे घेऊन जायची इच्छा असते पण कृत्रिम रेतन ना मध्ये गाईला गर्भधारणा होण्यासाठी कोणत्याही बैलाकडे नेण्याची गरज नसते हे आपल्याला माहिती आहे. तसेच कृत्रिम गर्भाधान रोग पसरण्याचा धोका आणि नुकसानदायक रेक्सेटिव्ह एलिल्स मोठ्या प्रमाणात कमी करते. बरेच शेतकरी कृत्रिम रेतन हाव वंध्यत्व किंवा पुनरावृत्ती प्रजननाचा उपचार म्हणतात.
पण तसे काही नसून रोगमुक्त जनुकीय दृष्ट्या जातिवंत वंशाच्या बैलाच्या वीर्यापासून गुरांना रेतन करण्याचीही एक कृत्रिम पद्धत आहे.
महत्वाच्या बातम्या
Published on: 08 May 2022, 11:13 IST