Animal Husbandry

सध्या सततच्या पावसामुळे दमट वातावरण निर्माण झाले आहे, अशावेळी शेतकऱ्यांनी शेळ्या मेंढ्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा अशा वातावरणात रोगजंतूं वाढण्याची शक्यता असते.

Updated on 20 August, 2022 10:31 AM IST

सध्या सततच्या पावसामुळे दमट वातावरण निर्माण झाले आहे, अशावेळी शेतकऱ्यांनी शेळ्या मेंढ्यांची (Goats and sheep) काळजी घेणे गरजेचे आहे. कारण अशा वातावरणात रोगजंतूं वाढण्याची शक्यता असते.

सततच्या पावसामुळे व दमट वातावरणामुळे जनावरे (Animal) अनेक संसर्गजन्य आजाराला बळी पडतात. त्यामुळे पशुधनाचे आजारांपासून संरक्षण करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने (Animal Husbandry Department) जनावरांची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पावसाळ्यात शेेळ्या (Goat) व मेंढ्यांमध्ये (Sheep) मर्तुक मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असते. त्यामुळे विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काळजी कशी घेणार? याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया..

Farmer Award: शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून मिळणार पुरस्कार; करा असा अर्ज

शेेळ्या-मेंढ्यांची कशी काळजी घ्या

1) शेळ्या (goat) व मेंढ्यांची काळजी घ्यावी. त्यांच्या निवार्‍याची दुरुस्ती करा. निवारा नसल्यास निवारा तयार करा. शेड व निवार्‍याचे नियमितपणे निर्जंतुकीकरण करा. पावसाचे पाणी शेळ्या मेंढ्यांच्या निवार्‍याजवळ जमा होऊ नये याची काळजी घ्यावी.

2) पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी कोरडा चारा किंवा भुसा यांचे आच्छादन जमिनीवर करावे. नवीन हिरव्या चार्‍यामुळे नायट्रेट विषबाधा, हायपोमॅग्नेशियमीक टिटॅनी यांसारख्या विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो, त्यामुळे वाळलेल्या चार्‍याची उपलब्धता करा. चारा भिजणार नाही याची काळजी घ्या.

Poultry Business! शेतकऱ्यांनो कुक्कुटपालनासाठी मिळणार 33 कोटीपेक्षा जास्त अनुदान; होईल फायदा

3) पशुधनास पावसात चरण्यासाठी सोडू नका. चारा पावसाने भिजलेला असू नये. बुरशी वाढणार नाही याची काळी घ्या. बुरशीयुक्त चारा (Fungal fodder) देण्याचे टाळा. मूरघास साठवण चरमध्ये पावसाचे पाणी जाणार नाही, याची काळजी घ्या. स्वच्छ व निर्जंतूक पाणी पिण्यास द्या. साचलेले पाणी पिण्यास देऊ नये.

4) पिण्याच्या पाण्याची हौदाची स्वच्छता करा. आपत्तीच्या वेळी मेंढ्यांची लोकर कातरणी थांबवा. या काळात पशुधनाचे आजारापासून संरक्षण करण्यासाठी घटसर्प रोग प्रतिबंधक लसीकरण करा. कारण अतिथंड वातावरणामुळे हायपोथर्मिया, अपचन, न्यूमोनिया आजार होण्याची शक्यता असते.

महत्वाच्या बातम्या 
Micro Irrigation Scheme: सूक्ष्म सिंचनासाठी शेतकऱ्यांना 55 टक्क्यांपर्यंत अनुदान; असा घ्या लाभ
Horoscope: 21 ऑगस्टपासून 'या' राशीच्या लोकांना होणार मोठा धनलाभ; वाचा तुमचे राशीभविष्य
Post Office Scheme: पोस्टाची 'ही' योजना ठरतेय अत्यंत फायदेशीर; 5 वर्षात मिळणार 14 लाख रुपये

English Summary: Animal Husbandry Shepherds goats sheep Important instructions
Published on: 20 August 2022, 10:20 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)