Animal Husbandry

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नेहेमीच चर्चेत असतात. कोणत्याही कामाला वेळ न लावला प्रसंगी अधिकाऱ्यांवर ते कामात होणाऱ्या दिरंगाईबाबत खडेबोल देखील सुनावतात. तसेच ते एखाद्याला काही बोलायला मागेपुढे पाहत नाहीत. कामात चुका असतील तर ते त्याच ठिकाणी बोलून दाखवतात.

Updated on 29 May, 2022 11:23 AM IST

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नेहेमीच चर्चेत असतात. प्रशासनावर त्यांची एक वेगळीच पकड आहे. एखाद काम होत असेल तर ते लगेच करून मोकळे होतात. कोणत्याही कामाला वेळ न लावला प्रसंगी अधिकाऱ्यांवर ते कामात होणाऱ्या दिरंगाईबाबत खडेबोल देखील सुनावतात. तसेच ते एखाद्याला काही बोलायला मागेपुढे पाहत नाहीत. कामात चुका असतील तर ते त्याच ठिकाणी बोलून दाखवतात. तसेच सकाळी ६ वाजल्यापासून त्यांचे दौरे हे सुरूच असतात.

आता पुण्यातील एका गोधन कृषी प्रदर्शनाच्या (Agricultural Exhibition) उदघाटनादरम्यान अजित पवार यांनी आपल्या कामाची आणि हजरजबाबीपणाची पुन्हा एकदा झलक दाखवली. कृषी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची अशी सरबत्ती केली की अधिकाऱ्यांना उत्तरे देताना दमछाक झाल्याचे दिसून आले. यामुळे याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अजित पवार यांनी प्रात्यक्षिके व देशी गाईंची (cow) सकाळी बारकाईने पाहणी केली. अजित पवार सुरुवातीच्या काळात हाच व्यवसाय करत असल्याने त्यांना याची सगळी माहिती आहे. याबाबत ते स्वतः अनेकदा भाषणात याचा उल्लेख देखील करतात. एखाद्या यामध्ये कृषी अधिकाऱ्यांना आणि शास्त्रज्ञांनाही माहिती नाही ती माहिती अजित पवार यांना माहिती असते. यामुळे त्यांचा दौरा असला की अधिकारी टेन्शनमध्येच असतात.

पाकिस्तानची उतरती कळा सुरू!! एकाच दिवशी पेट्रोलचे दर 30 रुपयांची वाढवले...

यावेळी अजित पवारांनी अनेक प्रश्न विचारल्याने अधिकारी आणि शास्त्रज्ञ दोघांचीही दमछाक झाली. पवारांनी स्वतः लहानपणापासून देशी गायी व गोठ्याचे व्यवस्थापन केलेले असल्याने बारीकसारीक माहिती त्यांना होती. यामुळे त्यांनी अनेक प्रश्नाची खैरातच केली. छोटया शेतकऱ्यांना परवडणारा प्लॅन्ट किती खर्चाचा असतो, आधुनिक पद्धतीने उभारलेल्या गोठ्यात जुन्या लाकडाचा वापर का केला, असे अनेक प्रश्न त्यांनी विचारले.

मित्रांनो गाडीची टाकी करा आजच फुल्ल! पेट्रोल पंपावर होणार खडखडाट...

तसेच गोठ्यात डोंगळे कसे, संकरित आणि देशी गायीच्या शेणखतात फरक कोणता, असे अनेक प्रश्न विचारणारे उपमुख्यमंत्री आणि त्यांचा अभ्यास पाहून सगळ्याना आश्चर्य वाटत होते. यावेळी मात्र अधिकऱ्यांना ते अजून नेमकं काय विचारणार आणि काय उत्तर द्यायाचे याचा नेमका अंदाज येत नव्हता, मात्र अजितदादांनी कधी प्रश्नांची सरबत्ती तर कधी मिश्किल टिप्पणी करीत तर कधी कौतुकाची थाप मारत सर्व उपक्रमांची आस्थेने माहिती घेतली.

महत्वाच्या बातम्या;
'या' भांड्यामध्ये ठेवा दूध, उन्हाळा असो किंवा पावसाळा तरी खराब नाही होणार
श्रीलंकेनंतर अजून एक देश आर्थिक संकटात, अन्नधान्यही संपले, भारताकडे मदतीची मागणी
यावर्षीही शेती परवडणार की नाही? बियाणांच्या दरात मोठी वाढ, सोयाबीन बॅग मागे 1 हजाराची वाढ

English Summary: Ajit Dad's study agriculture, officials overwhelmed, questions rained down officials.
Published on: 29 May 2022, 11:23 IST