Animal Husbandry

गुरांमध्ये अशा अनेक जनावरे आहेत, कि ज्यांची नावे ज्या त्या प्रदेशावरुन पडली आहेत. गीर गायचं नाव गीर जंगलावरुन पडलं आहे. मराठवाड्यात आढळणाऱ्या म्हशीचं नाव हे नागपुरी नावानं ओळखलं जातं. यासह पंढरपुरी म्हैस. या प्राण्यांची वैशिष्ट्ये आपल्या नावाप्रमाणेच सर्वांना परिचित आहेत.

Updated on 12 April, 2021 2:04 PM IST


गुरांमध्ये अशा अनेक जनावरे आहेत, कि ज्यांची नावे ज्या त्या प्रदेशावरुन पडली आहेत. गीर गायचं नाव गीर जंगलावरुन पडलं आहे. मराठवाड्यात आढळणाऱ्या म्हशीचं नाव हे नागपुरी नावानं ओळखलं जातं. यासह पंढरपुरी म्हैस. हे प्राण्यांची वैशिष्ट्ये  आपल्या नावाप्रमाणेच सर्वांना परिचित आहेत. महाराष्ट्रात अनेक गुरे आहेत, त्यांची नावेही त्या त्या भागावरुन पडली आहेत. यातील एक आहे कंधारी गाय. नांदेड जिल्ह्यात आढळणारी कंधारी गाय आता अनेक भागात पोहचली आहे. या गायीला पोसण्याचा खर्च फार कमी आहे,पण उत्पादनाच्या बाबतीत मात्र या गायीला जोड नाही.

नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात या गायी सर्वाधिक आढळत होत्या. परंतु गेल्या काही वर्षांपासून या गायींची संख्या या भागातून कमी होत आहे. या गायींची अनेक अशी वैशिष्ट्ये आहेत, जी इतर गाईंची तुलनेत कंधारी गायीला उजवे ठरवतात. या गायींचे वळू शेती कामासाठी खूप चांगले आहेत. या बैलांमध्ये जबरदस्त ताकद असते. जर आपण या जातीच्या गायी घेण्याचा विचार करत असाल तर आपल्याला जास्त पैसे खर्च करावे लागणार नाही. कारण या गाईंची किंमत ५० हजार रुपयांच्या आत असते. मात्र वळूची किंमत अधिक असते. गाँव कनेक्शन या वेबसाईटनुसार, या बैलांची किंमत लाखाच्या घरात असते. कंधारी गायी या भुरक्या रंगाच्या असतात किंवा लाल रंगाच्या असतात. याचे कान लांब असतात आणि खाली वाकलेले असतात. डोळ्याभोवती काळा रंगा असतो. शिंगे वळदार असतात पण ती लहान आकाराची असतात.

हेही वाचा : दुग्ध उत्पादनासाठी म्हशीपालन आहे बेस्ट; राज्यात पाळल्या जातात ‘या’ म्हशी

तर शेपटी लांब-लचक असते. शेपटीला काळेभोर केस असतात. या गाईंचे कपाळ हे रुंद असते, खांदा मात्र उंच असतो हे या गाईंचे वैशिष्ट्ये असते.  दरम्यान या गाईंची संख्या कमी होत असल्याने लाल कंधारी गुरांचे संवर्धन केंद्र उघडण्यात आले आहे. दुध देण्याच्या बाबतीत या गाई ४०० ते ६०० लिटर दूध देऊ शकतात. पण सरासरी आकडा आपण पकडला तर २३० ते २७० दिवसापर्यंत या गाई दूध देत असतात. या गायींचा भाकड काळ हा १३० ते १९० दिवसांचा असतो. एका दिवसात या गायी १.५ - ४ लिटर दूध देत असतात. या गाईंच्या दुधात ४.५७ टक्के फॅट असते.

 

English Summary: Affordable Kandhari cow; Gives more milk at lower cost
Published on: 17 October 2020, 05:46 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)