Animal Husbandry

सध्या उन्हाळ्याच्या तिव्र झळाचा अनुभव महाराष्ट्र घेत आहे. अंगाचा लाहीलाही करणारा उकाडा सर्वीकडे जाणवत आहे.

Updated on 14 April, 2022 9:30 PM IST

सध्या उन्हाळ्याच्या तिव्र झळाचा अनुभव महाराष्ट्र घेत आहे. अंगाचा लाहीलाही करणारा उकाडा सर्वीकडे जाणवत आहे.

या उकाड्यापासून वाचण्यासाठी मनुष्य मात्र पंखा, कुलर्स, रेफ्रिजरेटर आणिएअर कंडीशनर्स यांचा वापर करून उकाड्या पासून स्वतःचा बचाव करतात. मात्र मुक्या प्राण्यांना हा त्रास सहन करावाच लागतो. आता पशुपालनाचा जर विचार केला तर या वाढत्या तापमानाचा परिणाम हा गाय, म्हशीवर देखील मोठ्या प्रमाणावर होतो.त्यामुळे त्यांच्या दूध उत्पादन क्षमतेवर परिणाम होतोच परंतु एकंदरीत आरोग्य यावर देखील वाईट परिणाम होण्याची दाट शक्यता असते.त्यामुळे अशा प्राणिमात्रांचे उकाड्या पासून बचाव व्हावा यासाठी शेतकरी राजा शक्य ते  प्रयत्न करतात.

नक्की वाचा:खूपच ऊस तोडायचा बाकी आहे! पण मजूर घरी परतण्याच्या तयारीत, या साखर कारखाने काढली ऊसतोड मजुरांसाठी ही शक्कल

परंतु एका शेतकऱ्यांनी स्वतःच्या गोठ्यातील म्हशी साठी अशी व्यवस्था केली आहे कुल्लू आणि मनाली सारख्या थंड हवेचे अनुभव या म्हशींनायेत आहे.

म्हशीच्या वाड्यात लावले शॉवर

 वाशिम जिल्ह्यातील उमरा गावचे शेतकरी प्रवीण काळे यांनी त्यांच्याजवळ असलेल्या तेरा दुधाळू म्हशीसाठी अनोखी व्यवस्था केली आहे. जर आपण विदर्भाच्या एकंदरीत तापमानाचा विचार केला तर पारा हा कित्येक दिवसापासून 42 अंश याच्यापुढे आहे. याचा परिणाम दुधाळ म्हशीवर होऊ नये तसेच त्यांचे दूध उत्पादन क्षमतेवर परिणाम होऊ नये यासाठी प्रवीण यांनी एक युक्ती योजली. यासाठी त्यांनी एक मोटर घेतली आणि ती आपल्या गोठ्याच्या छतावर लावली. या छतावर जोडलेल्या मोटारीला पाण्याचे कनेक्शन कनेक्ट केलेहो एक कनेक्शनचा एक पाईप  पाण्याच्या टाकीमध्ये टाकला. ही सगळी व्यवस्था करीत असताना प्रवीण यांना पाचवीलाच पुजलेल्या लोडशेडिंगची देखील अडचण  या सगळ्या व्यवस्थे मध्ये येत होती.

नक्की वाचा:निसर्गाच्या लहरीपणाचा अंतिम टप्प्यात पिकांना फटका; शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चकनाचूर

यावर देखील त्यांनी उपाय शोधला. म्हणून त्यांनी सोलर पावर प्लांट च्या माध्यमातून गोठ्यातली शॉवर जोडून घेतले. त्यामुळे त्यांची ही युक्ती चांगलीच यशस्वी झाली आणि म्हशीचा या वाढत्या तापमानात पासून बचाव झाला. गोठ्यात लावलेल्या या शॉवर मुळेपूर्ण गोठ्यात थंडगार हवा राहत असून  म्हशीना देखील या प्रचंड  तापमानापासून दिलासा मिळाला आहे.ही सगळी व्यवस्था करण्यासाठी प्रवीण यांना चार ते पाच हजार रुपये खर्च आला.

English Summary: a farmer set shower in buffalo byre for coolness and save from high tempreture
Published on: 14 April 2022, 09:30 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)