Animal Husbandry

भारत हा एक कृषीप्रधान देश (Agrarian countries) आहे. विशेष म्हणजे आपल्या देशातील जवळजवळ 60% पेक्षा जास्त लोक शेतीवर अवलंबून आहेत. परंतु फक्त शेती (agriculture) करून पोट भरणे खूप कठीण झाले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी दुग्ध व्यवसाय करून चांगले उत्पादन घेत आहेत.

Updated on 02 September, 2022 6:50 PM IST

भारत हा एक कृषीप्रधान देश (Agrarian countries) आहे. विशेष म्हणजे आपल्या देशातील जवळजवळ 60% पेक्षा जास्त लोक शेतीवर अवलंबून आहेत. परंतु फक्त शेती (agriculture) करून पोट भरणे खूप कठीण झाले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी दुग्ध व्यवसाय करून चांगले उत्पादन घेत आहेत.

शेतकरी म्हशींचे पालन (Rearing of buffaloes) करूनही चांगले उत्पन्न घेऊ शकतात. बरेच शेतकरी म्हशींचे पालनपोषण करण्यास प्राधान्य देतात, कारण म्हशींचे पालन कमी खर्चात अधिक प्रमाणात दूध उत्पादन करण्यासाठी लोकप्रिय आहे.

शेतकऱ्यांना मोठा फटका! बटाटा-टोमॅटोच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या दर

म्हशीच्या सर्वोच्च जाती

पशुपालन आणि दूध उत्पादनाच्या बाबतीत भारतात म्हशीच्या २६ जाती आहेत. परंतु चिल्का, मेहसाणा, सुर्ती आणि तोडा या चार म्हशी चांगल्या दर्जाचे दूध देतात.

सुरती म्हैस

ही म्हैस मध्यम आकाराची असून तिचा रंग चांदीचा, राखाडी आणि काळा रंगाचा आहे. सुर्ती म्हशीचे टोकदार धड आणि लांब डोके तिला इतर म्हशींपेक्षा वेगळे करते. सुर्ती जातीच्या म्हशीच्या दुधात 8 ते 12 टक्के फॅटचे प्रमाण आढळते. सुरती म्हशी प्रती व्यात 900 ते 1300 लिटर दुधाचे उत्पादन करते, ज्यामुळे शेतकरी आणि पशुपालकांना चांगला नफा मिळू शकतो.

मेहसाणा म्हैस

महाराष्ट्रातील अनेक भागात या जातीच्या म्हशीपासून (buffalo) चांगल्या प्रमाणात दूध उत्पादन घेतले जाते. मेहसाणा म्हैस अधिक चपळ आणि शरीराचा आकारही अधिक आहे. काळ्या-तपकिरी रंगाच्या मेहसान म्हशीचे वजन कमी असते, परंतु ती प्रती व्यात 1200 ते 1500 लीटर दूध देऊ शकते. मेहसाणा म्हैस तिच्या विळ्याच्या आकाराच्या वक्र शिंगांसाठी ओळखली जाते.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; उडीदाचे भाव तेजीत, आता सरकारही करणार उडिदाची खरेदी

तोडा म्हैस

तोडा म्हैस (Break the buffalo) भारतातील निलगिरी डोंगररांगांमध्ये आढळते. या म्हशीच्या दुधात सुमारे 8 टक्के फॅट असते. म्हशीची दूध उत्पादन क्षमता प्रती व्यात 500 ते 600 लीटर प्रति ग्रॅम आहे. दूध उत्पादनात शेतकऱ्यांसाठी या म्हशीचे पालन फायदेशीर ठरू शकते.

चिल्का म्हैस

देशातील अनेक खारट भागात आढळणाऱ्या या म्हशीला देशी म्हशी देखील म्हणतात. ही म्हैस तिच्या मध्यम आकाराची आणि काळ्या-तपकिरी रंगाने ओळखली जाते. चिल्का (Chilka) म्हशीपासून प्रती व्यतामध्ये 500 ते 600 लिटर दूध उत्पादन मिळते.

महत्वाच्या बातम्या 
आता मोफत रेशन मिळणार की नाही? केंद्र सरकार याबाबत घेणार मोठा निर्णय
जनावरांचे दूध वाढविण्यासाठी 'हे' घरगुती उपाय आवश्यक
पोस्ट ऑफिससोबत सुरू करा 'हा' व्यवसाय; छोट्या गुंतवणुकीत मिळणार चांगला नफा

English Summary: 4 breeds buffaloes milk production
Published on: 02 September 2022, 06:42 IST