Animal Husbandry

सध्या शेतकऱ्यांना जनावरांची काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. लम्पी त्वचा आजारामुळे अनेक जनावरांचा मृत्यू होत असल्याने आता जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयाने पुढाकार घेतला आहे.

Updated on 29 September, 2022 3:45 PM IST

सध्या शेतकऱ्यांना (farmers) जनावरांची काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. लम्पी त्वचा (Lumpy skin) आजारामुळे अनेक जनावरांचा मृत्यू होत असल्याने आता जिल्हा पशुसंवर्धन (animal husbandry) कार्यालयाने पुढाकार घेतला आहे.

आपण पाहिले तर जिल्ह्यात काही ठिकाणी जनावरांवर लम्पी त्वचा आजाराचा (Lumpy Skin Disease) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असल्याचे दिसत आहे. या रोगाला प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन (Livestock) कार्यालयात जनावरांसाठी लस उपलब्ध करण्यात आली आहे.

शेतमाल वाहतुकीसाठी शेतकऱ्यांना मिळणार 75 टक्के अनुदान; आजच करा अर्ज

अमरावती जिल्ह्यासाठी 2 लाख 60 हजार लसी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना विशेष सूचना देण्यात येत आहेत. या रोगाची लक्षणे आढळून आल्यास पशुपालकांनी त्वरित पशू वैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा, असे आवाहन देखील जिल्हा पशुसंवर्धन (animal husbandry) उपायुक्त डॉ. संजय कावरे यांनी केले आहे.

दिलासादायक! पुणे बाजार समितीमध्ये मटारला मिळाला तब्बल 15 हजारांचा कमाल भाव

अधिक माहितीसाठी या टोलफ्री क्रमांक

पशुपालक तसेच शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. लम्पी स्कीन आजार उपचाराने पूर्ण बरा होतो. अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक १९६२ यावर संपर्क साधावा. विशेष म्हणजे यावरील लसीकरण व औषधोपचार (medication) मोफत करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांनी बाधित जनावरांवर त्यांनी त्वरित उपचार करून घ्यावे, अशा सूचना देखील दिल्या आहे.

महत्वाच्या बातम्या 
पोस्ट ऑफिसच्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतून वृद्धांना मिळणार लाखों रुपये; घ्या आजच लाभ
रब्बी हंगामातील कडधान्यांचे उत्पादन वाढणार; सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय
फक्त 999 रुपयांमध्ये इलेक्ट्रिक बाइक करा खरेदी; नवीन 'URBN' इ-बाइक लॉन्च

English Summary: 2 lakh 60 thousand vaccines available Amravati district
Published on: 29 September 2022, 03:45 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)