Agripedia

आज आपण या लेखात जरा हटके अशा ब्रह्मकमळाचे लागवडीबद्दल माहिती घेणार आहोत. ब्रह्मकमळ हे साधारण फुल नाही. ते परम पिता, विश्वाचे निर्माता ब्रह्माजी यांच्याशी संबंधित आहे.

Updated on 04 June, 2022 8:11 PM IST

 आज आपण या लेखात जरा हटके अशा ब्रह्मकमळाचे लागवडीबद्दल माहिती घेणार आहोत. ब्रह्मकमळ हे साधारण फुल नाही. ते परम पिता, विश्वाचे निर्माता ब्रह्माजी  यांच्याशी संबंधित आहे.

 ब्रह्मकमळाची वैशिष्ट्ये

 हे कमळ अतिशय खास आहे. बाजारात पाचशे ते एक हजार रुपयांना विकली जाते. आपल्या धार्मिक श्रद्धा मध्ये याला खूप महत्त्व आहे. पौराणिक मान्यतेनुसार हे ते फुल आहे ज्यावर ब्रम्हा विराजमान आहे. म्हणजेच एक ब्रह्मासन आहे.

 ब्रह्मकमळ कुठे सापडते?

 ब्रह्मकमळ भारतातील पर्वतीय प्रदेशात, विशेषतः हिमालयीन प्रदेशात मुबलक प्रमाणात आढळते. हे उत्तराखंड राज्याचे राज्यफुल देखील आहे. उत्तराखंडमध्ये याला कौलपदम असे म्हणतात.उत्तराखंडमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये त्याची लागवड केली जाते.

याचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते सामान्य कमळाप्रमाणे पाण्यात फुलत नाही. ते झाडावर वाढते आणि त्याचे एक आश्चर्यकारक वैशिष्ट्य म्हणजे बाकीची फुले सहसा सकाळी उमलतात, तिथे हे फुल रात्री उमलते. ब्रह्मकमळ वनस्पती चे वैशिष्ट्य म्हणजे ते वर्षभरात जुलै ते सप्टेंबर महिन्यातच फुले देतात.

नक्की वाचा:शेत रस्त्यांचे अनेक वर्षांपासूनचे वाद मिटले, शेतकरी समाधानी, देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित

 ब्रह्मकमळाचे लागवड केल्याने काय फायदे होतात?

 ब्रह्मकमळ हे अतिशय उपयुक्त फुल आहे. आज काल या फुलाचा उपयोग अनेक प्रकारचे आजार बरे करण्यासाठी केला जातो. जुनाट खोकल्यासाठी हा रामबाण उपाय आहे. सांधेदुखीत ही ब्रह्मकमळाचे फूल रसलिव्हर इन्फेक्शन आणि कॅन्सर या सारख्या आजारावर उपचार करण्यासाठी अतुलनीय असल्याचे सांगण्यात आले आहे.

अशा कोणत्याही दाव्याची शास्त्रीय किंवा प्रायोगिक दृष्ट्या अद्याप पुष्टी झालेली नसली तरी, स्थानिक समजुतीनुसार, हे फुल रोगांपासून बचाव करण्याच्या दृष्टिकोनातून खूप प्रभावी आहे. ब्रह्म कमळाच्या वाढत्या मागणीमुळे उत्तराखंडमध्ये त्याच्या लागवडीकडे विशेष लक्ष दिले जात आहे.

नक्की वाचा:महाराष्ट्र केसरी स्पर्धेत 'या' बैलजोडीची कमाल; वाऱ्याच्या वेगात धावतीये बैलजोडी

 ब्रह्मकमळ लागवड कशी करायची?

1- यासाठी प्राथमिक तयारी करणे आवश्यक आहे.

2- त्यासाठी अर्धी सामान्य माती आणि अर्धी जुने शेणखत मिसळून तयार करावे लागते.

3- त्यानंतर ब्रह्मकमळ पानाची तीन ते चार इंच खोलीवर लागवड करावी.

4- ब्रह्म कमळाचे पान लावल्यानंतर मडक्यात पुरेसे पाणी टाकावे आहे त्यानंतर ते भांडे अशा ठिकाणी ठेवावेत सूर्याचा प्रकाश पडत नाही. ब्रह्मकमळ वनस्पती साठी थेट सूर्यप्रकाश हानिकारक आहे.

5- त्याचे स्वरूप असे आहे की ते थंड ठिकाणी चांगले वाढते. यामुळेच उत्तराखंडमध्ये ते मोठ्या प्रमाणात आढळते. एका महिन्यात सर्व भुसा मधून मुळे वाढु लागतात.

6- विशेष काळजी घेणे आवश्यक आहे की जेव्हा ही वनस्पती मोठी होईल तेव्हा त्याला ओलावा टिकेल एवढेच पाणी द्यावे. कारण त्याला फार कमी पाणी लागते. जास्त पाणी दिल्यास ते वितळते किंवा खराब होऊ शकते.

7- ब्रह्मकमळाच्या फुलाची काळजीपूर्वक लागवड केल्यास या वनस्पतीपासून मिळणारी फुले शेतकरी बांधवांना चांगला नफा देऊ शकतात.

नक्की वाचा:Vidhan Parishad Election: भाजपचं ठरलं! विधान परिषदेसाठी हर्षवर्धन पाटील फिक्स? भाजपने आखली खास रणनीती

English Summary: what is the bramhakamal and cultivation process of that ?
Published on: 04 June 2022, 08:11 IST