Agripedia

गवार हे एक मुख्य भाजीपालावर्गीय पिक आहे. हे कोरडे आणि अर्ध-शुष्क प्रदेशातील एक महत्त्वाचे व्यावसायिक पीक आहे. हे एक दुष्काळी भागात वाढणारे पीक आहे, कारण की त्याची मूळे खोलवर रुजलेली असतात आणि म्हणुनच इतर पिकांच्या तुलनेत पाण्याच्या ताणातून बरे होण्याची क्षमता त्याच्यात जास्त आहे. गवारच्या बियांमध्ये 30-33 टक्के डिंक असतो, ज्यामुळे ते एक महत्त्वाचे औद्योगिक पीक बनते.

Updated on 10 April, 2022 1:56 PM IST

गवार हे एक मुख्य भाजीपालावर्गीय पिक आहे. हे कोरडे आणि अर्ध-शुष्क प्रदेशातील एक महत्त्वाचे व्यावसायिक पीक आहे. हे एक दुष्काळी भागात वाढणारे पीक आहे, कारण की त्याची मूळे खोलवर रुजलेली असतात आणि म्हणुनच इतर पिकांच्या तुलनेत पाण्याच्या ताणातून बरे होण्याची क्षमता त्याच्यात जास्त आहे. गवारच्या बियांमध्ये 30-33 टक्के डिंक असतो, ज्यामुळे ते एक महत्त्वाचे औद्योगिक पीक बनते.

गवार पिकासाठी उपयुक्त जमीन- हे कमी आणि मध्यम पावसाच्या हवामानात वाढणार पीक आहे. हे एक पावसावर आधारित पीक आहे. खरं पाहता गवार वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीत घेता येते. हे पीक चांगल्या निचऱ्याच्या, वालुकामय चिकणमाती असलेल्या जमिनीत चांगले उत्पादन देते. मात्र हे पीक जड चिकणमाती, क्षारयुक्त आणि क्षारीय माती असलेल्या जमिनीत वाढू शकत नाही. जमिनीच्या मातीचा pH मूल्य 7 ते 8.5 यादरम्यान असल्यास अशा जमीनीत या पिकाची लागवड यशस्वी ठरत असते.

गवारच्या सुधारित जाती नेमक्या कोणत्या?- आपणही गवार लागवड करण्याचा विचार केला असेल तर सर्वप्रथम याच्या सुधारित वाणाची माहिती जाणून घ्या. कोणत्याही पिकाच्या चांगल्या जातीची पेरणी केल्यास त्या पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन प्राप्त करता येते. गवार पिकाच्या देखील RGC 936, RGC 1002, RGC 1003, RGC 1066, HG 365, HG 2-20, GC 1, RGC 1017, HGS 563, RGM 116, RGC 116, RGC आणि RGC 1168, RGC 1017 या सुधारित वाणांची लागवड केल्यास चांगल्या दर्जाचे उत्पादन मिळवले जाऊ शकते.

गवार लागवड करण्याआधी पूर्वमशागत- उन्हाळ्यात कडक आणि जास्त तण असलेल्या जमिनीत एकदा नांगरणी करावी. यानंतर पावसाळ्यात दोनदा नांगरणी करून शेत तयार करावे. शेणखत उपलब्ध असल्यास, तीन वर्षांतून एकदा 20-25 गाड्या प्रति हेक्‍टर या प्रमाणे द्या.

या पिकाची चांगली उगवण होण्यासाठी शेत चांगले तयार असावे. पहिली नांगरणी माती फिरवणारा नांगर किंवा डिस्क हॅरोने करावी जेणेकरून किमान 20-25 सेमी खोल माती सैल होईल. यानंतर सपाट शेत तयार करण्यासाठी एक किंवा दोन नांगरणी करावी, यामुळे पाण्याचा चांगला निचरा होणे शक्य होईल.

पेरणीचा कालावधी - मुख्यतः या पिकाची पेरणी जूनच्या शेवटी किंवा जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात केली जाते. जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून गवार पेरणी केली तर उत्पादनात घट दिसून येते. यामुळे उशिरा गवार पेरणी करणे टाळावे. असे असले तरी देखील पाण्याची सोय असल्यास जुलैअखेरपर्यंत पेरणी करता येते.

English Summary: Want to earn more from agriculture? Then, plant guar;
Published on: 10 April 2022, 01:55 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)