सध्या खरीप हंगाम अंतिम टप्प्यात असून येणाऱ्या काही दिवसांनी रब्बी हंगामाची तयारी सुरू होईल. आपल्याला माहित आहेच कि गहू हे रबी हंगामातील प्रमुख पीक आहे. या पार्श्वभूमीवर आपण या लेखांमध्ये एक गव्हाच्या नविन वाणा बद्दल माहिती घेणार आहोत.हे वाण अल्मोडा येथील विवेकानंद हिल कृषी संशोधन संस्थेने तयार केला आहे. या वाणाची वैशिष्ट्ये म्हणजे बेकरी उत्पादने बनवण्यासाठी हे वाण खूप महत्त्वाचे ठरणार आहे.
नक्की वाचा:शेतकरी मित्रांनो पुढील 2 महिन्यात करा 'या' पाच पिकांची लागवड; मागणी असणार जादा
गव्हाचे VL 2041 वाण
अलमोडा येथील विवेकानंद कृषी संशोधन संस्थेने विकसित केलेल्या गव्हाच्या वाणचा वापर हा बेकरी उत्पादने तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात होणार असल्याने शेतकऱ्यांसाठी सुद्धा हा एक फायदेशीर वाण ठरणार आहे. त्यामुळे शेतकरी बंधू VL 2041 या गव्हाचे उत्पादन करून बाजारात चांगली किंमत मिळवू शकतात.
या संस्थेने विकसित केलेल्या या गव्हाच्या जातीची माहिती नुकत्याच झालेल्या 61 व्या भारतीय गहू आणि बार्ली संशोधकांच्या वार्षिक बैठकीत सांगण्यात आले आहे.
नक्की वाचा:शेतकरी मित्रांनो 'या' फुलाची लागवड करून ३० वर्षांपर्यंत घ्या कमाई; मिळेल चांगला नफा
शास्त्रज्ञांच्या मते ही जात उत्तराखंड, हिमाचल प्रदेश,मेघालय,जम्मू-काश्मीर आणि मणिपूर येथील शेतकऱ्यांसाठी फायद्याचे आहे. ही जात रोग प्रतिरोधक क्षमतांनी परिपूर्ण असून गव्हामध्ये आढळणाऱ्या प्रमुख रोगांना प्रतिरोधक आहे.
तसेच या जातीच्या गव्हामध्ये प्रथिनांचे प्रमाणही जास्त असल्याचे आढळून आले आहे. या जातीमध्ये सरासरी 09.07 टक्के प्रथिनांचे प्रमाण नोंदविले गेले आहे. गहू मऊ असून सर्व गुणांमुळे हे वाण बेकरी उत्पादनांसाठी सर्वोत्तम असल्याचे म्हटले जात आहे.
नक्की वाचा:Crop Protection: ट्रायकोकार्ड म्हणजे काय? कसा करावा वापर व काय होतो फायदा?
Published on: 07 September 2022, 03:34 IST