Agripedia

मित्रांनो बाजारात मागणी मध्ये असलेल्या आणि महागड्या फळांची शेती शेतकऱ्यांना मोठी फायदेशीर ठरू शकते. पारंपरिक पीक पद्धतीत शेतकरी बांधवांना मोठा तोटा सहन करावा लागत असल्याने. नवीन नगदी पिकांची तसेच बाजारात मागणी मध्ये असलेल्या पिकांची शेती निश्चितच शेतकऱ्यांसाठी वरदान सिद्ध होणारी आहे. यामुळे आज आपण व्हॅनिला शेती विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

Updated on 18 May, 2022 4:37 PM IST

मित्रांनो बाजारात मागणी मध्ये असलेल्या आणि महागड्या फळांची शेती शेतकऱ्यांना मोठी फायदेशीर ठरू शकते. पारंपरिक पीक पद्धतीत शेतकरी बांधवांना मोठा तोटा सहन करावा लागत असल्याने. नवीन नगदी पिकांची तसेच बाजारात मागणी मध्ये असलेल्या पिकांची शेती निश्चितच शेतकऱ्यांसाठी वरदान सिद्ध होणारी आहे. यामुळे आज आपण व्हॅनिला शेती विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

मित्रांनो खरं पाहता केशर हे सर्वात महागडे असते मात्र यानंतर सर्वात महागडी वनस्पती आहे व्हॅनिला. व्हॅनिला हे सर्वात महागडे पीक म्हणून ओळखलं जातं. याची शेती आपल्या भारतात देखील केली जाते. भारताव्यतिरिक्त याची शेती मादागास्कर, पापुआ न्यू गिनी, आणि युगांडा यांसारख्या देशांमध्ये केली जाते.

यासाठी होतो व्हॅनिलाचा उपयोग

मित्रांनो व्हॅनिला रोपातून बाहेर पडणाऱ्या फळाचा आकार कॅप्सूलसारखा असतो. स्पाइसेस बोर्ड ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार, जगभरात तयार होणाऱ्या आइस्क्रीममध्ये व्हॅनिला फ्लेवरचा वापर 40 टक्क्यांपर्यंत आहे. व्हॅनिला फळाचा सुगंध देखील खूप आकर्षक असतो, ज्यामुळे याचा केक, परफ्यूम आणि इतर सौंदर्य उत्पादने बनवण्यासाठी वापर केला जातो. यामुळे याला चांगली बारामाही मागणी असते शिवाय बाजारात व्हॅनिला फळे आणि बियांना चांगला दर देखील मिळतं असतो.

Business Idea: 5 हजारात सुरु करा 'हा' व्यवसाय; मालक बना आणि कमवा लाखों; वाचा याविषयी

व्हॅनिला शेतीसाठी आवश्यक शेत जमीन 

मित्रांनो कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, जर शेतकरी बांधवांना व्हॅनिला या पिकांची शेती करायची असेल तर शेतकऱ्यांनी याची लागवड तपकिरी माती असलेल्या शेत जमिनीत करावी. अशा शेत जमिनीत या पिकाची शेती केल्यास त्यापासून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवता येते. याशिवाय ज्या शेतजमिनीचा पी.एच. अर्थात सामू 6.5 ते 7.5 या दरम्यान असतो अशा मातीमध्ये या पिकाची लागवड करावी. त्यामुळे निश्चितच उत्पादनात वाढ होणार आहे.

झाड एक फायदे अनेक; या झाडाची लागवड करा आणि बारा वर्षात बना करोडपती; वाचा सविस्तर

व्हॅनिला शेतीतुन होणारी कमाई 

व्हॅनिलाच्या बियांना मिळतो 40 ते 50 हजार किलोचा दर 

कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, व्हॅनिला फुले तयार होण्यासाठी सुमारे दहा महिन्यांचा कालावधी लागत असतो. यानंतर, रोपांमधून बिया काढल्या जातात. या बिया नंतर खाद्यपदार्थ बनवण्यासाठी वापरल्या जातात. सध्या भारतात व्हॅनिला बियांची किंमत 40 ते 50 हजार रुपये प्रति किलो आहे. अशा परिस्थितीत व्हॅनिलाची मोठ्या प्रमाणावर लागवड केल्यास शेतकरी बांधव यापेक्षा कितीतरी अधिक नफा मिळवून करोडपती होऊ शकतात.

English Summary: Vanilla Cultivation: Start cultivating vanilla and earn millions; Its fruits and flowers are sold very expensive; Read about it
Published on: 18 May 2022, 04:37 IST