Agripedia

मिरची हे दैनंदिन वापरला जाणारा पदार्थ असून स्वयंपाक घरात मिरची नसेल असं होऊ शकत नाही. वर्षभर बाजारात मागणी असलेले हे पीक असून यामधील शिमला मिरचीला देखील बाजारपेठेत वर्षभर चांगली मागणी असते.हे एक शेतकऱ्यांना चांगला नफा देणारे पीक असून शिमला मिरचीच्या लागवडीसाठी उत्तर प्रदेश सरकारचा चक्क शेतकऱ्यांना 37 हजार 500 रुपये अनुदान देखील देते.

Updated on 12 August, 2022 12:43 PM IST

मिरची हे दैनंदिन वापरला जाणारा पदार्थ असून स्वयंपाक घरात मिरची नसेल असं होऊ शकत नाही. वर्षभर बाजारात मागणी असलेले हे पीक असून यामधील शिमला मिरचीला देखील बाजारपेठेत वर्षभर चांगली मागणी असते.हे एक शेतकऱ्यांना चांगला नफा देणारे पीक असून शिमला मिरचीच्या लागवडीसाठी उत्तर प्रदेश सरकारचा चक्क शेतकऱ्यांना 37 हजार 500 रुपये अनुदान देखील देते.

या सगळ्या गोष्टींमुळे त्या ठिकाणची शेतकरी अधिक नफा मिळावा यासाठी शिमला मिरचीची जास्त प्रमाणात लागवड करतात. उत्तर प्रदेश राज्यातील हरदोई जिल्ह्याचा विचार केला तेथील शेतकरी शिमला मिरची लागवडीतून चांगले उत्पादन मिळवत असून

त्या ठिकाणची मिरची दिल्लीहून आग्रा येथे विक्रीसाठी पाठवण्यात येते. तेथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, शिमला मिरची लागवड करण्याआधी एक हेक्टर जमीन पडीक राहू देतात व त्यानंतर चांगली नांगरून त्यामध्ये खत टाकतात.

एवढेच नाही तर  त्या जमिनीतील तण काढून टाकल्यानंतर तणनाशक व हानिकारक जीवाणूविरोधी औषधांची फवारणी करून मग सिमला मिरचीची लागवड करतात. पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचन प्रणालीचा वापर ते करतात.

नक्की वाचा:Agricultural Business: 'या' झाडाची शेती ठरतेय अत्यंत फायदेशीर; काही वर्षातच तुम्ही व्हाल करोडपती

 सिमला मिरची लागवडीवर अनुदानाचे स्वरूप

 शिमला मिरची लागवडीसाठी शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ दिला जातो परंतु उत्तर प्रदेश राज्य हे शिमला मिरचीच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना चक्क 70 टक्के सबसिडी देते. जर शेतकऱ्याने दीड हेक्टर शिमला मिरची लागवड केली तर सुमारे 37 हजार 500 रुपये शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात दिले जातात.

त्यासोबतच बिहार राज्याचा विचार केला तर तेथील शेतकऱ्यांना सिमला मिरचीच्या लागवडीसाठी 75 टक्के सबसिडी दिली जाते व दोन हजार चौरस मीटर मध्ये शेडनेट तयार करायचे असेल तर शासनाकडून 75 टक्के अनुदान दिले जाते.

समजा शेतकऱ्यांनी दोन हजार चौरस मीटर चे शेडनेट तयार केले तर त्यासाठी 25 लाख रुपये खर्च आला तर राज्य सरकार यामध्ये 18 लाख 75 हजार रुपये अनुदान देते.

नक्की वाचा:Floriculture: गुलाब लागवडीत जर 'अशा' पद्धतीने घेतली काळजी तर नक्कीच मिळेल भरघोस नफा आर्थिक उत्पन्न

 शिमला मिरचीची एकंदरीत मिळणारे उत्पादन

 तसे पहायला गेले तर कुठल्याही हवामानात शिमला मिरची लागवड करता येते लागवडीनंतर 75 दिवसात उत्पादन सुरू होते. वेळेवर खत, पाणीव्यवस्थापन ठेवले तर नक्की चांगले उत्पादन मिळते तसेच रोग व किडींच्या बंदोबस्तासाठी शिफारशीत कीडनाशकांची वेळेवर फवारणी करणे देखील गरजेचे आहे.

तसेच जमिनीचा पीएच यासाठी खूप महत्त्वाचा असून तो सहा पर्यंत असावा.

 सिमला मिरचीचे उपयुक्त वाण

 सध्या जास्त प्रमाणात शेतकरी कॅलिफोर्निया वंडर, येलो वंडर, रॉयल वंडर, ग्रीन गोल्ड, अर्का गौरव, अर्का मोहिनी, डायमंड, आशा इत्यादी  जातींची लागवड करतात. शिमला मिरचीची मागणी हॉटेल्स, मोठमोठे मॉल्स आणि ढाब्यांमध्ये जास्त असून सध्या शंभर रुपये किलोने बाजारात विकले जात आहे.

नक्की वाचा:Crop Tips:ऑगस्ट मध्ये तयार करा 'या' भाजीपाला पिकांची रोपवाटिका, बरोबर सापडेल बाजारभाव आणि मिळेल नफा

English Summary: uttar pradesh give 37500 subsidy to capsicum chilly cultivation
Published on: 12 August 2022, 12:43 IST