Agripedia

तुर पिकात कळ्या व फुले दिसू लागताच पहिल्या फवारणीत तुरीवरील किडींच्या एकात्मिक

Updated on 10 October, 2022 8:50 PM IST

तुर पिकात कळ्या व फुले दिसू लागताच पहिल्या फवारणीत तुरीवरील किडींच्या एकात्मिक व्यवस्थापन योजनेचा घटक म्हणून पाच टक्के निंबोळी अर्क या वनस्पतीजन्य कीटकनाशकाची फवारणी करा.(A) वाळलेल्या निंबोळ्या पासून पाच टक्के निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धत : (१) शेतकरी बंधूंना दरवर्षी पावसाळा सुरू होण्याच्या आधी प्रत्येक शेतकऱ्याने सर्वसाधारण सर्व पिकाकरिता कीड व्यवस्थापन करण्याकरता पाच टक्के निंबोळी अर्काचा वापर करायचा आहे म्हणून किमान 50 ते

100 किलो निंबोळ्या उपलब्ध असताना जमा कराव्यात. नंतर ह्या निंबोळ्या चांगल्या वाळवून साफ करून साठवून ठेवाव्यात.After that, dry these nimbolas well and keep them clean.(२) फवारणीच्या आदल्या दिवशी एक एकर क्षेत्र फवारणी करायची आहे असे

या वर्षी गहू लागवड व व्यवस्थापन करा या पद्धतीने आणि घ्या भरघोस उत्पन्न

गृहीत धरून पाच किलो वाळलेल्या निंबोळ्या कुटून बारीक कराव्यात.(३) नंतर पाच किलो वाळलेल्या निंबोळी चा कुटून बारीक केलेला चुरा नऊ लिटर पाण्यात फवारणीच्या आदल्या दिवशी सायंकाळी भिजत टाकावा. तसेच एक लिटर पाण्यात दोनशे ग्रॅम साबणाचा चुरा वेगळा भिजत ठेवावा.

(४) दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे फवारणीच्या दिवशी निंबोळीचा नऊ लिटर पाण्यात रात्रभर भिजत ठेवलेला अर्क फडक्यातून चांगला काढून घ्यावा. या अर्कात एक लिटर पाण्यात तयार केलेले साबणाचे द्रावण मिसळावे. हा सर्व अर्क एकूण दहा लिटर होईल एवढे पाणी टाकावे.(५) वर नमूद केल्याप्रमाणे तयार केलेला निंबोळी अर्क एक लिटर अधिक नऊ लिटर साधे पाणी या प्रमाणात मिसळून ढवळून फवारणीसाठी वापरावा. अशाप्रकारे निंबोळी अर्क फवारणी च्या दिवशीच तयार करून वापरावा.

(B) पाच टक्के निंबोळी अर्क तुर पिकात कोणत्या अवस्थेत वापरावा? : शेतकरी बंधुंनो पाच टक्के निंबोळी अर्क तुर पिकात तुरीला कळ्या व फुले दिसू लागताच पहिल्या फवारणी करिता एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा घटक म्हणून प्रभावीपणे वापरता येतो. तूर पिकावरील शेंगा पोखरणारी अळी, शेंगमाशी, पिसारी पतंग, तुरीवरील मारूका यासारख्या किडीच्या प्रतिबंध व व्यवस्थापनाकरिता प्रभावी ठरू शकतो.शेतकरी बंधूंनो घरच्या घरी तयार करून कमी खर्चात

प्रभावीपणे पाच टक्के निंबोळी अर्काचा वापर करणे केव्हाही चांगले परंतु काही कारणास्तव निंबोळी अर्क वापरू शकत नसल्यास तूर पिकावर कळ्या व फुले दिसू लागतात Azadirachtin 300 PPM हे बाजारातील निंबोळी युक्त वनस्पतिजन्य कीटकनाशक 50 मिली अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन तुरीवरील किडीच्या एकात्मिक व्यवस्थापन योजनेचा भाग म्हणून आपण पहिली फवारणी तुरीला कळ्या व फुले दिसू लागताच करू शकता.

 

राजेश डवरे कीटकशास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम

English Summary: Use this medicine for the first spray as soon as the buds and flowers appear in the tur crop
Published on: 10 October 2022, 08:16 IST