ह्या वर्षी हवामानातील बदल आणि अधिक पावसामुळे खरीप हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन आणि कापूस पिकांचे नुकसान झाले त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. ह्या वर्षी पाऊसअधिक झाल्याने विहिरी, बोअरवेल,धरणे, शेततळे व इतर जलस्रोतांमध्ये पाण्याचा साठा भरपूर उपलब्ध आहे. शेतकर्यांनी ह्या संधी चा फायदा करून घेतला पाहिजे असे मला वाटते.खरीप हंगामातील पिकांची काढणी सुरू आहे. कापूस वेचणीने वेग घेतला आहे, शेतकरी आता रब्बी हंगामातील पिकांचे नियोजन करीत असतील.
मित्रांनो, रब्बी हंगामातील पिकांचे विक्रमी उत्पादन घ्यावयाचे असेल तर पारंपारिक Friends, the traditional if record production of Rabi season crops is to be had आणि मोकळ्या पाण्यावर, पाटपाणी पद्धतीने ते मिळू शकणार नाही
हे लक्षात घेतले पाहिजे. खुप जादा पाणी दिल्याने खुप उत्पादन मिळते असा शेतकर्यांचा गैरसमज आहे, मित्रांनो असे कधीच होत नाही. पिकांच्या संपूर्ण कालावधीमध्ये पिकांच्या मुळांच्या कार्यक्षेत्रात फक्त वाफसा पाहिजे असतो ते मोकाट सिंचन पद्धती मध्ये शक्य होत नाही. पाण्याचा अपव्यय होतो तसेच दिलेली खतेही झिरपून जातात, विजेचा वापर ही
जास्त होतो आणि आपण लोड शेडिंग च्या नावाने तक्रार करीत असतो. मित्रांनो म्हणुनच थोडासा गांभीर्याने विचार करा गेली कित्येक वर्ष आपण पारंपारिक पद्धतीने मोकाट सिंचन पद्धतीने रब्बी हंगामातील पिके घेत आलो आहोत, उत्पादन कमी मिळते व त्यापासून नफा कमी मिळतो. मित्रांनो आता आपली मानसिकता बदलली पाहिजे. रब्बी हंगामातील सर्व पिकांसाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा म्हणजे ठिबक सिंचन अथवा रेन पोर्ट सिंचन / तुषार सिंचन पद्धतीचा वापर केला पाहिजे म्हणजे विक्रमी उत्पादन मिळेल आणि आर्थिक नफा
जास्त मिळेल. मित्रांनो, शेती हा व्यवसाय म्हणुन केल्यास त्यात गुंतवणूक तर करावी लागेल. शेती करताना वापरण्यात येणाऱ्या सर्व निविष्ठां मध्ये सूक्ष्म सिंचन पद्धती वर गुंतवणूक अधिक फायदेशीर आहे कारण सूक्ष्म सिंचन पद्धती अधिक वर्ष फायदा देतात तर बाकी निविष्ठां फक्त एकच वर्ष, एकच हंगामापूरते वापरता येतात. रब्बी हंगामात गहु, हरभरा, मका, कांदा, काकडी, टरबूज, खरबूज, भुईमूग, ऊस, सूर्यफुल, करडई, मोहरी ही पिके घेतात, ह्या सर्व पिकांसाठी सूक्ष्म
सिंचन पद्धती चा अवलंब करता येईल.कोणत्या पिकासाठी कोणत्या ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन पद्धती चा वापर करावयाचा व कसा वापर करावयाचा ह्या बाबतीत आम्ही तंत्रज्ञान विकसीत केले आहे. रब्बी हंगामातील वर उल्लेख केलेल्या सर्व पिकां च्या अधिक उत्पादनासाठी ठिबक सिंचन अथवा तुषार सिंचन पद्धती चा वापर करून विक्रमी उत्पादन मिळवावे.जैन इरिगेशन सिस्टिम्स लि 1963 पासून शेतकर्यांच्या
सोबत काम करीत असून शेतकर्यांना नवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून त्यांचे उत्पादन वाढवून त्यांच्या साठी समृद्धी आणण्यासाठी मदत करीत आहेत.रब्बी हंगामातील पिकासाठी सर्व पिकांचे विक्रमी उत्पादन कसे काढावे ह्याचे प्रगत तंत्रज्ञान जैन इरिगेशन सिस्टिम्स लि कडे उपलब्ध आहे.अधिक माहिती साठी आमच्या स्थानिक प्रतिनिधी किंवा जैन ठिबक सिंचन चे विक्रेत्यां कडे सम्पर्क करावा.रब्बी हंगामातील पिकांचे अधिक उत्पादन मिळण्या साठी शुभेच्छा.
- डॉ. बी डी जडे, ९४२२७७४९८१.
वरिष्ठ कॄषीविद्या शास्त्रज्ञ,
जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.
Published on: 08 October 2022, 09:17 IST