देशातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उडीद शेती बघायला मिळते. आपल्या राज्यातही शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उडीद शेती करत असतात. मित्रांनो आज आपण उडीद शेती विषयी काही महत्त्वाच्या बाबी जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी.
उडीद लागवडीसाठी साधारणपणे सिंचनाची फारशी गरज नसते. मात्र, शेंगा तयार होण्याच्या वेळी पाणी द्यावे. या पिकाला 3 ते 5 वेळा सिंचनाची गरज असते. पहिले पाणी पेरणी नंतर द्यावे व उर्वरित पाणी 20 दिवसांच्या अंतराने द्यावे.
खुरपणी
तणांमुळे पिकांचे अपेक्षेपेक्षा जास्त नुकसान होते. त्यामुळे चांगल्या उत्पादनासाठी वेळोवेळी खुरपणी, करावी तसेच आधुनिक तणनाशकाचा योग्य वापर करावा. वासॅलिन 800 मिली ते 1000 मिली प्रति एकर 250 लिटर पाण्यात मिसळून ओललेल्या शेतात फवारणी केल्यास चांगले परिणाम मिळतात.
Mansoon 2022: मान्सून संदर्भात आताची सर्वात मोठी बातमी; या तारखेला मान्सून येणार महाराष्ट्रात; वाचा
उडीद बियाण्यावर रायझोबियम बिजोपचार
उडीद हे शेंगायुक्त पीक असल्याने, चांगले एकत्रित उत्पादन आणि मुळांमध्ये बॅक्टेरियाच्या गाठींची योग्य वाढ होण्यासाठी बियांवर रायझोबियम कल्चरची प्रक्रिया करणे आवश्यक आहे. 10 किलो बियाण्यांसाठी एक पॅकेट (200 ग्रॅम) कल्चर योग्य आहे.
उपचार करण्यापूर्वी, अर्धा लिटर पाण्यात 50 ग्रॅम गूळ किंवा साखर मिसळून द्रावण तयार करा. त्यानंतर कल्चर मिसळून द्रावण तयार करा. आता हे द्रावण बियांमध्ये चांगले मिसळा आणि वाळवा. बिजोपचार पेरणीपूर्वी 7-8 तास आधी केले पाहिजे.
Business Idea: बारामाही डिमांड मध्ये असलेला हा व्यवसाय बनवु शकतो कमी वेळेत श्रीमंत; वाचा सविस्तर
उडीद पीक फेरपालट आणि मिश्र शेती
पावसाळ्यात उडदाचे पीक अनेकदा मका, ज्वारी, बाजरी, कापूस, तूर इत्यादी पिकात आंतरपीक म्हणुन घेतले जाते.
Published on: 15 May 2022, 12:18 IST