शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. आज तुरीला सर्वाधिक 8 हजार 115 रुपयांचा कमाल भाव मिळाला असल्याने शेतकरी (Farmers) वर्ग आनंदात आहे. हा भाव मलकापूर कृषि उत्पन्न बाजार समितीत मिळाला आहे.
मलकापूर कृषि उत्पन्न बाजार समितीत या बाजार समितीत आज 330 क्विंटल ची आवक झाली. यासाठी किमान भाव 6025 कमाल भाव 8115, सर्वसाधारण भाव 7700 इतका मिळाला.
आज तुरीची सर्वाधीक आवक ही अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत (Agricultural Produce Market Committee) झाली आहे. ही आवक 1257 क्विंटल तुरीची (Tur Market Price) झाली, यासाठी किमान भाव 6000, कमाल भाव 8100, सर्वसाधारण भाव 7300 इतका मिळाला आहे.
हे ही वाचा
50 Thousand: शेतीमध्ये चांगले उत्पादन घ्या आणि 50 हजार रुपये जिंका; जाणून घ्या पिकस्पर्धा योजनेबद्दल
तुरीचे भाव तेजीत
सध्या तुरीचे भाव (Turi price) सर्वधिक तेजीत असल्याचे दिसून येत आहे. तुरीला (Tur Market Price) कमाल भाव ८ हजार रुपयांच्या पुढे मिळत आहे. सध्या मालाची असलेली कमी आवक आणि त्याच्या तुलनेत असलेली जास्त मागणी यामुळे तुरीला चांगला भाव मिळत असल्याने समजत आहे. विशेष म्हणजे नवीन तूर यायला आणखी वेळ आहे. त्यामुळे सध्या तुरीच्या भावात तेजी आहे.
महत्वाच्या बातम्या
Crops Diseases: फळबाग आणि भाजीपाला पिकांवर रोग; काय कराल उपाय? जाणून घ्या...
Animal Husbandry: पशुपालकांनो सावधान! जनावरांना होतेय विषबाधा; 'या' वनस्पतीपासून ठेवा लांब, जाणून घ्या
Rain Condition: मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यातील पाऊस खरीप पिकांसाठी फायद्याचा ठरेल का? जाणून घ्या
Published on: 03 August 2022, 04:09 IST