टोमॅटो हे महत्त्वाचे भाजीपाला पीक असून महाराष्ट्रात आणि एकंदरीत संपूर्ण भारतात देखील बर्याच ठिकाणी टोमॅटोची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. जर महाराष्ट्राचा विचार केला तर भारतामध्ये महाराष्ट्र हे टोमॅटो उत्पादनाच्या बाबतीत अग्रस्थानी आहे. परंतु शेतकर्यांना आर्थिक नफा देणारे हे पीक बऱ्याचदा शेतकऱ्यांना जास्त खर्च करायला लावते परंतु त्यामानाने उत्पन्न फार कमी येते.
या समस्येचा जर आपण शोध घेतला तर विविध प्रकारच्या किडी व रोगाच्या प्रतिबंधासाठी होणारा खर्च या परिस्थितीला कारणीभूत आहे.
टोमॅटो पिकामध्ये विविध प्रकारचे व्हायरस हे उत्पादन घटीमागील सगळ्यात मोठे कारण आहे. या लेखामध्ये आपण टोमॅटो वरील विविध प्रकारचे व्हायरस व त्यांच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना इत्यादी बद्दल माहिती घेऊ.
टोमॅटोवरील विविध व्हायरस
जर आपण टोमॅटो पिकावरील व्हायरसचा विचार केला तर यांचा प्रमुख वाहक हे पांढरी माशी आणि थ्रिप्स म्हणजेच फुलकिडे हे प्रामुख्याने असतात.
जर या दोन्ही किडींचा वेळीच बंदोबस्त केला नाही तर 90 टक्क्यांपर्यंत आर्थिक नुकसान करण्याची क्षमता त्यांच्यात आहे.म्हणून टोमॅटो लागवडी नंतर अगदी बारकाईने पांढरी माशी आणि फुलकिडे यांचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यामधील आपण तिरंगा व्हायरस ची माहिती घेऊ.
टोमॅटोवरील तिरंगा व्हायरस
फुलकिडे हे प्रमुख वाहक असून टोमॅटोवरील अलीकडच्या काळातील सर्वातगंभीर स्वरूपाचा असा रोग आहे. लागवड केल्यानंतर 30 ते 35 दिवसांमध्ये टोमॅटो वर फुलकिडे दिसायला लागतात व ते शेवटपर्यंत राहतात. हे मोठ्या संख्येने येतात व टोमॅटोची पाने कुरतडतात आणि पाझरणारा रस शोषून घेतात.
यामुळे टोमॅटोच्या रोपाच्या उतीमध्ये टॉस्पो वायरसचे संक्रमण होते आणि टोमॅटोच्या कोवळ्या पानांवर ठिपके पडून लागण झालेल्या भागामध्ये फिक्कट चंदेरी रंगाचे पट्टे दिसतात व झाडाची पाने वरच्या बाजूने गुंडाळले जातात तसेच फळांवर फिक्कट तपकिरी रंगाचे चट्टे दिसायला लागतात.
टोमॅटोच्या देठावर देखिल पट्टे दिसू लागतात. ज्या रोपावर या व्हायरसची लागण होते त्या रोपांची वाढ एका बाजूने होते किंवा वाढ पूर्णपणे थांबते देखील शकते आणि पाने गळायला लागतात.
हंगामाच्या अगदी सुरुवातीला या रोगाची लागण झाली तर फळधारणा होत नाही व फळधारणा झाल्यानंतर लागण झाली तर फळांवर हिरव्या बांगडी च्या आकाराचे ठिपके दिसतात.एवढेच नाही तर नवीन पानांवर तपकिरी रंगाच्या रिंगा देखील पडतात. जर उशिरा लागण झाली असेल तर रोपांना डागाळलेली फळे लागतात.
यासाठी उपाययोजना
यासाठी प्रतिबंधात्मक उपाय हेच महत्त्वाचे आहेत. एकदा जर रोपाला याची लागण झाली तर व्हायरस संसर्ग झालेले रोप बरे करणे शक्य होत नाही. परंतु यासाठी टोमॅटोच्या रोपांच्या सुरुवातीच्या काळात रक्षण करणे हा एक चांगला उपाय असूनत ज्ञांचा सल्ला घेणे खूप महत्त्वाचे आहे.
Published on: 14 August 2022, 12:37 IST