Agripedia

पिकांच्या निरोगी वाढीसाठी आणि चांगल्या उत्पादनासाठी रासायनिक खतांचा वापर शेतकरी करीत असतात. कारण लागणार्या सगळ्या पोषक घटकांची संतुलित पूर्तता करण्यासाठी रासायनिक खतांचा वापर तितकाच महत्त्वाचा आहे. रासायनिक खतांसोबतच वेगवेगळ्या प्रकारच्या सेंद्रिय खतांचा देखील वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.

Updated on 29 July, 2022 2:22 PM IST

 पिकांच्या निरोगी वाढीसाठी आणि चांगल्या उत्पादनासाठी रासायनिक खतांचा वापर शेतकरी करीत असतात. कारण लागणार्‍या सगळ्या पोषक घटकांची संतुलित पूर्तता करण्यासाठी रासायनिक खतांचा वापर तितकाच महत्त्वाचा आहे. रासायनिक खतांसोबतच वेगवेगळ्या प्रकारच्या सेंद्रिय खतांचा देखील वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.

आपल्याला माहित आहेच कि नत्र, स्फुरद व पालाश हे तीनही मुख्य अन्नद्रव्य पिकांसाठी खूप महत्त्वाचे असतात. परंतु यांचा पुरवठा जेव्हा आपण खतांच्या माध्यमातून पिकांना करतो, तेव्हा खरोखरच आपण विचार करतो का की, पिकांना कितपत यांचा उपयोग होतो किंवा झाला असेल.

तर याचे उत्तर बऱ्याचअंशी नाही असच येईल. त्यामुळे काही छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष दिले तर या पोषक घटकांची कार्यक्षमता वाढते व पिकांना त्याचा चांगला फायदा होतो.  या लेखामध्ये आपण स्फुरद या मुख्य अन्नद्रव्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी चे उपाययोजना बघू.

नक्की वाचा:Micro Nutrients: हवे भरघोस उत्पादन तर करा 'या' पद्धतीने सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर, मिळेल बक्कळ कमाई

या पद्धतीने वाढवता येईल स्फुरदाची कार्यक्षमता

1- बऱ्याचदा आपण खते टाकताना  झाडाच्या मुळाजवळ टाकतो. यामध्ये स्फुरदयुक्त खते  झाडांना टाकताना एक क्रियाशील मुळांच्या परिसरात योग्य खोलीवर पेरून द्यावी.

2- जर शेतामध्ये पिकांना रॉक फॉस्फेटसारखी खते द्यायची असतील तर ते मातीसोबत मिसळून दिले तर त्यांची कार्यक्षमता चांगली वाढते. परंतु या खताच्या कणांचा आकार अति लहान असावा व ही खते तीन ते चार आठवडे पेरणीपूर्वी द्यावी.

3- आपण जेव्हा खतांचा पुरवठा करतो तेव्हा ते दाणेदार स्वरूपात असतात. अशा स्फुरदयुक्त दाणेदार खतांचा अधिक परिणामकारक वापर करण्यासाठी ही खते शेणखत किंवा कंपोस्ट खतासोबत 1:2 या प्रमाणात वापरले तर त्याची कार्यक्षमता वाढते.

नक्की वाचा:Soil Care:पिकांचे उच्च उत्पादन हवे असेल तर मातीतील क्लोराईडचे परीक्षण आहे गरजेचे,वाचा महत्वाची माहिती

3- रॉक फॉस्फेटचा वापर करताना ते जर कंपोस्ट, शेणखत किंवा प्रेसमड सोबत दिले तर अगदी चुनखडी असलेल्या जमिनीत देखील ते खूप परिणामकारक ठरते.

4- आपण बऱ्याचदा शेतामध्ये सुपर फॉस्फेटचा वापर शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात करतात.

हे सुपरफास्ट देताना ते जर कोंबडी खतासोबत किंवा बायोगॅस स्लरी त्यांच्यासोबत दिले तर खूप कार्यक्षमता त्याची वाढते.

5- जेव्हा आपण जिवाणू संवर्धक म्हणजे स्फुरद विरघळणारे जिवाणू संवर्धकांचा वापर करतो तेव्हा ते शेणस्लरी किंवा बीज प्रक्रिया करून द्यावे.

6- पिक लागवडीपूर्वी दरवर्षी शेतात शेणखत किंवा कंपोस्ट खताची मात्रा नियंत्रित प्रमाणात द्यावी.त्यामुळे जे काही आपण स्फुरदयुक्त खते पिकांना देतो त्यांचे स्थिरीकरण न होता त्यांचा उपयोग पिकांना पुरेपूर होतो.

नक्की वाचा:Agri Advice: करायची फायदेशीर शेती तर कृषी शास्त्रज्ञांचा वाचा 'हा' सल्ला, 'या' गोष्टींकडे या आठवड्यात द्या लक्ष

English Summary: this useful method for growth efficiency phosphorus fertilizer
Published on: 29 July 2022, 02:22 IST